थायरॉईड कंट्रोलमध्ये आणयचाय? आजच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, नाहीतर होईल पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 03:30 PM2021-07-26T15:30:56+5:302021-07-26T15:31:33+5:30

थायरॉईडवर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहेच पण आपला आहारही महत्त्वाचा आहे. थायरॉईडचा त्रास असले तर पथ्य पाळावी लागतात.

Want to get your thyroid under control? Include 'these' foods in your diet today, otherwise you will regret it | थायरॉईड कंट्रोलमध्ये आणयचाय? आजच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, नाहीतर होईल पश्चाताप

थायरॉईड कंट्रोलमध्ये आणयचाय? आजच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, नाहीतर होईल पश्चाताप

googlenewsNext

थोडं जास्त काम केलं तरी तुम्हाला थकावटीची जाणीव होते किंवा तुमचं वजन अचानक वाढायला लागतं किंवा शरीराच्या विविध भागांत मंद-मंद दुखायला लागतं किंवा त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नेहमी ताण-तणावात दिसू लागता तर समजून जा की ही थायरॉईडची लक्षणे आहेत.थायरॉईडवर वेळेवर उपचार होणे गरजेचे आहेच पण आपला आहारही महत्त्वाचा आहे. थायरॉईडचा त्रास असले तर पथ्य पाळावी लागतात. यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याची माहिती डाएटिशियन डॉ. स्मिता सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला दिली आहे.

थायरॉईड म्हणजे काय?
थायरॉइड हा एक हार्मोन्सशी निगडीत आजार आहे. थायरॉइडच्या ग्रंथी आपल्या मेटाबॉलिज्म कंट्रोल करतात. आपलं मेटाबॉलिज्म स्लो काम करेल की सामान्यपणे कार्य करेल हे थायरॉइड हार्मोन्सवर अवलंबून असतं. आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉइड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉइड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात. हा आजार मुख्यत्वे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. यासोबतच शरीरातील पोषक तत्वांचा अभाव जसं की झिंक, सेलेनियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे या आजाराचा धोका वाढतो. काही प्रकरणांमध्ये आनुवंशिकता देखील याला जबाबदार असू शकते.

थायरॉईडचे दोन प्रकार असतात

  1. हायपोथायरॉइडइजम
  2. हायपरथायरॉइडइजम

कसा असावा थायरॉईड रुग्णांचा आहार

दुधी 
हायपोथायरॉडीझम असलेल्या लोकांनी हाय मेटाबॉलिक रेट असलेल्या भाज्या खाव्या .यासाठी अशा रुग्णांनी दुधी ही भरपूर फायबर असलेल्या भाजी आहारामध्ये समाविष्ट करावी. ही भाजी पचनास हलकी असल्यामुळे यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो.

हिरव्या पालेभाज्या
योग्य औषधांसोबतच डायटवर लक्ष देऊन थायरॉइड नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. आपल्या देशात वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या बिन्स व भाज्या उपलब्ध असतात. थायरॉइडच्या रुग्णांनी बिन्सचे अधिक सेवन केले पाहिजे. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असते. हिरवे बिन्स व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि न्युट्रियंट्सने भरपूर समृद्ध असतात. यामुळे थायरॉइड ग्रंथीतील हार्मोन्सना संतुलित ठेवण्याचं काम या भाज्या चांगल्या रितीने पार पाडतात.

बदाम
बदामात भरपूर प्रमाणात फायबर असते. अँटीऑक्सीडेंट असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असायला हवा. मेटाबॉलिझमच्या अकार्यक्षमतेमुळे शरीरात ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस व फ्री रेडीकल्सची निर्मिती वाढते. त्यामुळे जांभूळ, द्राक्ष, टोमॅटो, अक्रोड, दही यासारखे पदार्थ थायरॉईडच्या रुग्णांनी खायला हवेत. अँटीऑक्सीडेंटमुळे स्ट्रेस देखील कमी होतो. 

कलिंगड
कलिंगड हे थायरॉईडच्या रुग्णांसाठी वरदान आहेत. यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. त्यामुळे वजनही कमी होते तसेच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. यात व्हिटॅम‍िन सी, ई, लाइकोपीन, पोटॅश‍ियम आद‍ि घटक असतात. १०० ग्रॅम कलिंगडात ०.५ ग्रॅम फायबर असते.

फणस
थायरॉइडच्या समस्येचा सामना करत असाल, तर तुम्ही फणसाचे सेवन करावे. फणसात कॉपर तत्व असतात, ज्यामुळे थायरॉइड ग्रंथीचा स्त्राव संतुलित राहतो. फणसात असलेल्या मॅग्नेशियममुळे हाडं मजबूत होतात.

Web Title: Want to get your thyroid under control? Include 'these' foods in your diet today, otherwise you will regret it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.