शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

Heart Disease: जलदगतीने चालणं हृदयविकारावर रामबाण! संशोधनातून सांगितले अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 18:09 IST

अलीकडे हृदयविकाराचं (Heart Fail) प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर जलद गतीनं चालण्याचा (Brisk Walking) व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचं अमेरिकेतल्या (USA) एका संशोधनात सिद्ध झालं आहे.

उत्तम आरोग्यासाठी (Health) व्यायाम (Exercise) महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात जीवनशैली, आहाराच्या पद्धती बदलल्यामुळे अनेकांना आजार कमी वयातच ग्रासत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे हृदयविकाराचं (Heart Fail) प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर जलद गतीनं चालण्याचा (Brisk Walking) व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचं अमेरिकेतल्या (USA) एका संशोधनात सिद्ध झालं आहे. विशेषत: ज्येष्ठ महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका ३४ टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

अमेरिकेतल्या ब्राउन युनिव्हर्सिटीने (Brown University, USA) नुकत्याच केलेल्या एका संशोधनात जलद चालण्याच्या व्यायामामुळे महिलांना (Women) वृद्धापकाळातही (Older Age) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका कमी होऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार ब्राउन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 25 हजारांहून अधिक ज्येष्ठ महिलांवर जवळपास 20 वर्षं संशोधन केलं. या संशोधनात सहभागी महिलांना त्या दररोज किती चालतात याबाबत माहिती विचारण्यात आली. त्यांच्या उत्तरांच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला. यात असं आढळून आलं, की ज्या महिला वेगाने चालतात त्यांना हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी असतो. काही महिला संथ गतीनं चालतात. कारण त्यांचे स्नायू कमजोर झालेले असू शकतात; मात्र संथ गतीनं चालणाऱ्यांपेक्षा वेगवान चालणाऱ्यांना अधिक फायदे मिळतात, असं अभ्यासात स्पष्ट झालं आहे. या काळात १४५५ महिलांचं हार्ट फेल (Heart Fail) झालं. अर्थात त्यांच्या हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता संपली, असं या संशोधनात आढळून आलं.

याबाबत बोलताना या संशोधनकार्याचे प्रमुख डॉ. चार्ल्स इटॉन म्हणाले, १४५५ महिलांना हृदयविकाराचा झटका आला, याचा अर्थ वाढत्या वयानुसार त्यांच्या हृदयाची संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता कमी होऊ लागली. यावर जलद गतीने चालण्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं.'

५० ते ७९ वर्षं वयोगटातल्या महिलांमध्ये हार्ट फेल्युअर अर्थात हृदय बंद पडण्याची समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे वाढत्या वयात हा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं असून, त्यात जलद गतीनं चालण्याच्या व्यायामाला प्राधान्य देणं सर्वांत महत्त्वाचं आहे,' असंही डॉ. चार्ल्स इटॉन यांनी स्पष्ट केलं.

चालण्याचा व्यायाम सहजसोपा व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. जलद गतीनं चालण्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. यामुळे अनेकांना आपलं आयुष्य निरोगी राखण्यासाठी व्यायाम करण्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स