नवी दिल्ली: भारतीय किशोरवयीन मुलांमध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंकची कमतरता सर्वाधिक आढळते, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो, ५ टक्के किशोरवयीन मुले उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. केंद्र सरकारच्या अलीकडील अहवाल 'चिल्ड्रन इंडिया'मध्ये किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. १० ते १९ वयोगटातील तब्बल २४ टक्के मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची तर ३२ टक्के मुलांमध्ये झिंकची कमतरता आढळली आहे.
ग्रामीण भागात जास्त मृत्यूग्रामीण भागात बालमृत्युदर २८, तर शहरी भागात १८ एवढा आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात सर्वाधिक ३७, तर केरळमध्ये केवळ ५ इतका सर्वात कमी दर नोंदवला गेला आहे.
किशोरावस्थेतील आरोग्याचे वाढते धोकेअहवालात असेही आढळून आले की, पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीरात अनेक गंभीर आजारांची लक्षणे दिसून येतात. या वयोगटातील १०.४ टक्के मुले मधुमेहपूर्व अवस्थेत, ४.९ टक्के उच्च रक्तदाबाने आणि ४.९ टक्के उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत. तसेच, ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले असून, त्यामुळे भविष्यात हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
Web Summary : Indian adolescents face Vitamin D and zinc deficiencies, raising risks of serious illnesses. High blood pressure, pre-diabetes, and high cholesterol are prevalent. Rural child mortality is higher than urban, especially in Chhattisgarh and Madhya Pradesh.
Web Summary : भारतीय किशोर विटामिन डी और जस्ता की कमी से जूझ रहे हैं, जिससे गंभीर बीमारियों का खतरा बढ़ रहा है। उच्च रक्तचाप, प्री-डायबिटीज और उच्च कोलेस्ट्रॉल आम हैं। छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश में ग्रामीण बाल मृत्यु दर शहरी क्षेत्रों की तुलना में अधिक है।