शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

आरोग्यासाठी जीवनसत्त्व सी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:00 IST

एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो.

- डॉ. कांचन खैराटकरसध्या भारतात चायनीज पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते आहे. एका प्रसिद्ध जर्नलमध्ये असे संशोधन झाले आहे कीं चायनीज पदार्थ सतत खाण्यात ठेवले तर चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम होऊ शकतो. कधी भारतीय रेस्टॉरंट सिंड्रोम ऐकले आहे का हो !काय आहे हा सिंड्रोम? यामध्ये घशास अचानक सूज येणे , चक्कर येणे, पोटात दुखणे आणि वारंवार खाज येणे अशी लक्षणे चायनीज पदार्थांच्या सेवनोत्तर होतात. त्याचे कारण त्यातील घटक मोनोसोडियम ग्लुटामेट हा आहे. त्याला टेस्ट मेकर म्हणजे उत्कृष्ट चव निर्माण करणारा आहे, बर मान्य ! मग जे चवीसाठी उत्कृष्ट ते आरोग्यासाठी घातक कसे? कारण फक्त चवीचा विचार करून आहार बनविणे ही भारतीय संस्कृती नाही. आपली आहार संस्कृती ही वय, काल, देश, संस्कार आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून बनलेली आहे मग वसंत ऋतूत सुंठवडा असेल, कडक उन्हात खजुराचे सरबत असेल किंवा वेगवेगळे मुरांबे असतील, चातुर्मास आणि वर्षा ऋतुत हिंग तूप असेल, ऋतु, सण, वार आणि आहार अगदी आखीव -रेखीव!मला अनेकदा हा प्रश्न स्वत:ला पडतो की, इतके वैविध्य असताना वेगळीकडे का आस धरावी? ‘वेगळी चव’ इतपत ठीक पण तो आयुष्याचा भाग कसा काय व्हावा? असो ! आपला आजचा विषय आहे पुढील जीवनसत्त्व सी...जीवनसत्त्व सी हे बहुधा सर्व फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. पूर्वी दमूनभागून, उन्हातान्हात फिरुन आल्यानंतर, खेळ खेळून आल्यानंतर लिंबू सरबत दिले जायचे. आईचा आवाजच असायचा ‘चला, सरबत प्यायला.’ आज असे चित्र खूपच कमी पाहायला मिळते. लिंबू सरबत ही अतिशय उत्तम परंपरा आहे.भाज्या जास्त वेळ साठवून ठेवणे, चिरून खूप वेळाने वापरणे, खूप शिजविणे या प्रक्रियेने हे जीवनसत्त्व कमी होते तेव्हा बाजारातून चिरून ठेवलेल्या भाज्या आणताना विचार करणे अत्यावश्यक आहे शिवाय फ्रिजमध्ये किती दिवस ठेवायच्या याचाही विचार करायला हवाच ना! फळे आणि भाज्याचा हवेशी संपर्क आला की सी जीवनसत्त्व कमी होते.आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, कोलॅजन निर्मिती, हृदयसंस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था यांच्या उत्तम कार्यासाठी याची आवश्यकता असते. सध्याच्या नवीन संशोधनानुसार हे कर्करोगप्रतिबंधक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. मुख्यत्वे इ जीवनसत्त्वाला याचे पूरक कार्य आहे. उत्तम अ‍ँटी आॅक्सिडंट आहे. धूम्रपान करणारे, धावपळ, ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींनी हे जीवनसत्त्व घेणे अत्यावश्यक आहे.आता आपण पुढील जीवनसत्त्व पाहूया ते म्हणजे बी जीवनसत्त्व. या जीवनसत्त्वात अनेक जीवनसत्त्वांचा समावेश होतो. विटॅॅमिन बी १, रिबोफ्लेव्हिन बी २, निअ‍ॅसिन बी ३, पँटोथेनिक अ‍ॅसिड बी ५, पायरिडॉक्सिन बी ६, बायोटीन बी ७, फॉलिक अ‍ॅसिड बी ९, आणि कोबॅलॅमिन बी १२, यालाच बी कॉम्प्लेक्स म्हणतात.आपल्याकडे पूर्वी विरजण लावण्याची पद्धत होती. शेजारील काकू, मावशी, आजी अशी अनेक नाती या निमित्ताने निर्माण व्हायची. विरजण लावणे म्हणजे दही लावणे आणि अगदी नैसर्गिकरीतीने बर का ! या दह्यात ब १२ तयार होते! ताजे दही, ताक यापासून ब १२ मिळते.दही भात, दही पोहे, दही बुंदी, दही चकली, अहो दही आणि मस्त लसूणदाण्याची चटणी आणि कडक भाकरी! अहाहा!चला, मग मस्त दही लावायला आजपासूनच सुरुवात करुयात का! अहो सगळ्या जीवनसत्त्वांनी युक्त असा हा आपला पारंपरिक आहार आहे. आजपर्यंत आपण जीवनसत्त्व अ, ड, इ,के,सी आणि बी पाहिले आणि त्या सर्वांनी युक्त विविधरंगी पारंपरिक आहार पाहिला. चला, तर मग नवीन सुरुवात करूयात आणि आरोग्यासाठी पोषणयुक्त पारंपरिक आहाराचा स्वीकार करूयात !शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी), मज्जासंस्था कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.पूर्ण धान्य, बदाम, कारळे, शेंगदाणे, पालक, सर्व हिरव्या भाज्या, अंडी, मासे, ताजी फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये बी जीवनसत्त्व असते.लिंबू वर्ग, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात विटामीन सी असते .

(लेखिका आयुर्वेदतज्ज्ञ आहेत) 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स