शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

व्हिटॅमिन 'सी' ची कमतरता ठरू शकते धोकादायक; डोळ्यांची दृष्टी जाण्याचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 16:33 IST

महिलांच्या शरीरात ७५ टक्के व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते तर पुरुषांच्या शरीरात ती ९० टक्के इतकी असते. आपले शरीर ना व्हिटॅमिन सी बनवू शकत ना साठवून ठेऊ शकत त्यामुळे आहारात रोज व्हिटॅमिन सी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय तोटे होऊ शकतात.

सद्य कोरोनाकाळात व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहित असेल. मात्र व्हिटॅमिन सी चे महत्त्व फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याइतपतच पुरेसे नसुन त्याचे अनेक परिणाम आपल्या शरीरावर होतात. महिलांच्या शरीरात ७५ टक्के व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते तर पुरुषांच्या शरीरात ती ९० टक्के इतकी असते. आपले शरीर ना व्हिटॅमिन सी बनवू शकत ना साठवून ठेऊ शकत त्यामुळे आहारात रोज व्हिटॅमिन सी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय तोटे होऊ शकतात.

जखमा हळू भरतातव्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील जखमा भरण्यास वेळ लागतो. जखम झाल्यावर व्हिटॅमिन सी चा रक्तातील स्तर जखमेच्या खाली जातो. जखम भरून येण्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. तसेच कोलेजन व्हिटॅमिन सी न्युट्रोफिलसाठी देखील फायदेशीर असते. न्युट्रोफिल म्हणजे रक्तातल्या पांढऱ्या पेशी ज्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतात. पण व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे या सर्व क्रियेत बिघाड होतो व जखम भरायला जास्त वेळ लागतो.

हिरड्यातून व नाकातून रक्त येणेव्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांतून रक्त येण्याची समस्या भेडसावू शकते. एका संशोधनानुसार असे लक्षात आले की ज्यांच्या हिरड्यांतून रक्त येत होते त्यांनी दोन आठवडे द्राक्ष खाल्ल्यानंतर रक्त येणे बंद झाले. तसेच व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे नाकातून रक्त येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते.

वजन वाढणेव्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे वजन वाढण्याचीही शक्यता असते. कारण व्हिटॅमिन सी शरीरातील फॅटला उर्जेमध्ये बदलते. त्यामुळे शरीरातील फॅट विशेषत: पोटाची चरबी कमी होते.

रुक्ष आणि सुरकुत्या आलेली त्वचातुमच्या आहारात जर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असेल तर तुमची त्वचा रुक्ष आणि सुरकुत्यांनी भरलेली दिसू शकते. तेच जर व्हिटॅमिन सीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचा तजेलदार होते व चमकु लागते.

थकवा आणि चिडचिडेपणाव्हिटॅमिन सी शरीरात कमी असल्यास थकवा जाणवतो तसेच दिवसभर चिडचिडेपणा राहतो. १४१ लोकांवर केलेल्या संशोधनानुसार व्हिटॅमिन सी दिल्यावर त्या लोकांच्या शरीरातील थकवा आणि चिडचिडेपणा दूर झाला.

दृष्टीवर परिणामव्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुमच्या दृष्टीवर विपरीत परीणाम होऊ शकतो. तुमच्या आहारात जर व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात असेल तर तुमचे डोळे निरोगी राहतातच पण मोतीबिंदूचा त्रासही कमी होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स