लॅपटॉपच्या वापरामुळे पुरूषांना होतोय 'हा' आजार, विवाहित लोकांसाठी अधिक घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:13 PM2024-01-24T17:13:14+5:302024-01-24T17:13:45+5:30

काळजी न घेता सतत लॅपटॉपचा वापर करणं पुरूषांसाठी फार घातक ठरू शकतो. यामुळे तुम्हाला ओलिगोस्पर्मिया नावाचा आजार होऊ शकतो.

Using laptop can causes infertility in men know symptoms causes | लॅपटॉपच्या वापरामुळे पुरूषांना होतोय 'हा' आजार, विवाहित लोकांसाठी अधिक घातक

लॅपटॉपच्या वापरामुळे पुरूषांना होतोय 'हा' आजार, विवाहित लोकांसाठी अधिक घातक

आजकाल सगळी कामे लॅपटॉप आणि मोबाइलवर केली जातात. कुणाला पैसे ट्रान्सफर करणं असो किंवा कुणाशी ऑनलाईन बोलणं असो इतकंच काय तर ऑफिसचं काम आणि सिनेमा बघणंही लॅपटॉपवरच केलं जातं. लोक तासंतास लॅपटॉपवर काम करत असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याच्या अधिक किंवा सततच्या वापराने आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

काळजी न घेता सतत लॅपटॉपचा वापर करणं पुरूषांसाठी फार घातक ठरू शकतो. यामुळे तुम्हाला ओलिगोस्पर्मिया नावाचा आजार होऊ शकतो जो विवाहित पुरूषांमध्ये इन्फर्टिलिटीचं कारण बनतो. पुरूषांमधील इन्फर्टिलिटीचं म्हणजे त्यांच्यात वडील होण्याची क्षमता कमी असण्याबाबत फार बोललं जात नाही. कारण याबाबत फार कमी जागरूकता आहे. याबाबत एका एक्सपर्टने माहिती दिली आहे.

भारतात वाढते आहे ही समस्या

आयसीएमआरच्या एका रिसर्चचा हवाला देत सांगण्यात आलं की, भारतात जवळपास 15 टक्के विवाहित जोडपे इन्फर्टिलिटीच्या समस्येचा सामना करत आहेत. यामागे ओलिगोस्पर्मिया आजार असतो ज्यात शुक्राणुंची वाढ कमी होते. ही समस्या हलकी, मध्यम आणि गंभीर असू शकते.

लॅपटॉपचा जास्त वापर घातक

पुरूषांमध्ये ही समस्या असण्यामागे लॅपटॉपचा अधिक वापर हे कारण आढळून आलं आहे. डॉक्टरांनुसार, लॅपटॉप आणि मोबाइल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर  टेस्टिकल्सचं काम बिघडवतो. यामुळे टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणुंच्या निर्मितीवर प्रभाव पडतो.

ओलिगोस्पर्मिची लक्षण

डॉक्टरांनी सांगितलं की, ओलिगोस्पर्मियामध्ये कोणतंही स्पष्ट बाहेरील  लक्षण दिसत नाही. तरीही काही असे संकेत असतात जे ही स्थिती असण्याची शक्यता सांगतात.

- इजॅक्यूलेशन दरम्यान वीर्य कमी येणे

- वीर्य पाण्यासारखं पातळ असणे

- अंडकोषाच्या आजूबाजूला वेदना आणि सूज

-  पुन्हा पुन्हा रेस्पिरेटटरी इन्फेक्शन

- पुरुषांमध्ये ब्रेस्ट टिश्यू वाढणे

याची कारणे

वॅरिकोसेले

हार्मोनल असंतुलन

अत्यधिक धूम्रपान

मद्यसेवन

ड्रग्सचं सेवन आणि लठ्ठपणा

जुने आजार

सर्जरी किंवा संक्रमण
 

Web Title: Using laptop can causes infertility in men know symptoms causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.