शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जास्त उपवास केल्याने उद्भवू शकते 'ही' समस्या, वाचा उपवास करूनही शरीर निरोगी कसं ठेवायचं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 13:47 IST

जे लोक वारंवार उपवास करतात. त्यांच्या शरीरात  युरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. या

शरीरात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असलेल्या पदार्थांचा आहारात घेतल्यास युरिक एसिड्चं प्रमाण वाढतं.  साधारणपणे शरीरातील युरिक एसिड मुत्राद्वारे बाहेर पडत असतं. पण युरिक एसिड मुत्राद्वारे योग्य प्रमाणात बाहेर पडलं नाही तर शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.   जे लोक वारंवार उपवास करतात. त्यांच्या शरीरात  युरिक एसिडचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. त्यामुळे स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याच्या बाबतीत काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

युरीक अ‍ॅसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे ३० वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. हे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडमुळे  होते. जे ब्लड सर्क्युलेशनद्वारे किडनी पर्यंत पोहोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते. युरीक अ‍ॅसिड वाढल्यानंतर  शरीरात गाठी सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.

शरीरातील युरिक एसिड का वाढतं?

हाय प्रोटीन्स फुड म्हणजेच कोबी, टॉमेटो, मासं जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. गरजेपेक्षा जास्त डायटिंग केल्याने, जास्त उपवास केल्याने शरीरातील उर्जा कमी होते त्यामुळे युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. अनेकदा किडनी खराब असल्यामुळे शरीरातील युरिक एसिड योग्य प्रमाणात बाहेर पडत नाही. त्यामुळे शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. मधुमेहामुळेही शरीरातील युरिक एसिडचं प्रमाण वाढतं. 

शरीरातील युरिक एसिड नियंत्रणात ठेवण्याचे  उपाय

जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे.

प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका. 

संत्रीमध्ये व्हिटामीन सी, पोटॅशियम, फ्लेवोनॉइड्स, असते. त्यामुळे शरीरातील युरिक एसिड बाहेर निघण्यास मदत होते. शरीरातील युरिक एसिडची पातळी नियंत्रणात राहते. 

युरिक एसिडचं शरीरातील प्रमाण नियंत्रणात ठेवायचं असेल तर  चटपटीत पदार्थ, भाजलेले पदार्थ, जंक फूड, सोया मिल्क अशा पदार्थांचे सेवन टाळा. 

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्यूरिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील. 

गुळवेलाच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. त्यासाठी गुळवेलाचे सेवन करावे. 

आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या २ ते ३ तास आधी स्क्रिनपासून लांब राहावे. रोज नियमीत व्यायाम करून तुम्ही या त्रासापासून आपली सुटका करू शकता. शारीरिकदृष्या बळकट राहण्यासाठी रोज व्यायाम करा. 

CoronaVirus News : रुग्णालयात बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णानं उभारलं रुग्णालय अन्...

'या' सवयीमुळे वाढत आहे कोरोनाचा संसर्गाचा धोका; आरोग्य मंत्रालयाची माहिती

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स