बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 14:53 IST2025-11-23T14:49:31+5:302025-11-23T14:53:52+5:30

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन रिसर्चमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

uranium levels breast milk mothers bihar health risks | बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका

बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन रिसर्चमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासानुसार, ४० स्तनपान देणाऱ्या मातांच्या ब्रेस्ट मिल्क सँपलमध्ये युरेनियमचं प्रमाण अत्यंत उच्च आढळलं. हा रिसर्च पाटणा येथील महावीर कॅन्सर संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रो. अशोक घोष यांनी एम्स, नवी दिल्ली येथील बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमसह केला.

ऑक्टोबर २०२१ ते जुलै २०२४ दरम्यान केलेल्या संशोधनात भोजपूर, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, कटिहार आणि नालंदा येथील १७ ते ३५ वयोगटातील ४० महिलांच्या ब्रेस्ट मिल्क सँपलचं विश्लेषण केलं गेलं. सर्व नमुन्यांमध्ये युरेनियम (U-238) आढळून आलं, ज्याचं प्रमाण ० ते ५.२५ g/L पर्यंत होतं.

खगरियामध्ये सरासरी पातळी सर्वाधिक आढळली, नालंदामध्ये सर्वात कमी आणि कटिहारमधील एका सँपलमध्ये सर्वाधिक होती. जवळजवळ ७० टक्के बाळं याच्या संपर्कात आली ज्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एम्सचे सह-लेखक डॉ. अशोक शर्मा म्हणाले की युरेनियमचा सोर्स अद्याप अस्पष्ट आहे. युरेनियम कुठून येत आहे हे आम्हाला अद्याप माहित नाही. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण देखील याची चौकशी करत आहे. दुर्दैवाने, युरेनियम फूड चेनमध्ये प्रवेश करतो आणि कॅन्सर, न्यूरोलॉजिकल समस्या आणि मुलांच्या विकासावर गंभीर परिणाम घडवतो, जो खूप मोठा चिंतेचा विषय आहे.

ब्रेस्ट मिल्कमधील युरेनियमची उपस्थिती दर्शवतं की, प्रदुषणामुळे हे झालं आहे. लहान मुलं युरेनियमबद्दल विशेषतः संवेदनशील असतात कारण त्यांचे अवयव अजूनही विकसित होत असतात, ते अधिक विषारी धातू शोषून घेतात, युरेनियम किडनीला नुकसान पोहोचवतं, न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण करते आणि नंतरच्या आयुष्यात कॅन्सरचा धोका वाढवू शकते.

Web Title : चौंकाने वाला: स्तन के दूध में यूरेनियम, शिशुओं को कैंसर का खतरा

Web Summary : अनुसंधान से पता चला है कि छह जिलों के स्तन के दूध के नमूनों में यूरेनियम है, जिससे शिशुओं में कैंसर और तंत्रिका संबंधी समस्याएं हो सकती हैं। संदूषण का स्रोत अज्ञात है, जांच जारी।

Web Title : Alarming: Uranium Found in Breast Milk, Cancer Risk to Infants

Web Summary : Research reveals uranium in breast milk samples from six districts, potentially causing cancer and neurological issues in infants. Source of contamination remains unknown, prompting investigation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.