Unlock 1.0 : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच रेस्टॉरन्टमध्ये जात असाल तर 'या' 7 चुका करणे टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 03:47 PM2020-06-09T15:47:22+5:302020-06-09T16:05:54+5:30

रेस्टॉरन्टमध्ये हात धुणे, मास्क घालणे आणि सरफेसला स्पर्श न करणे याशिवायही अशा काही गोष्टी आहेत ज्यांद्वारे तुम्ही कोरोनापासून बचाव करू शकता.

Unlock 1.0 : Mistakes to avoid at a reopened restaurant after corona lockdown | Unlock 1.0 : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच रेस्टॉरन्टमध्ये जात असाल तर 'या' 7 चुका करणे टाळा!

Unlock 1.0 : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच रेस्टॉरन्टमध्ये जात असाल तर 'या' 7 चुका करणे टाळा!

Next

(Image Credit : nytimes.com)

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात मंदिर, मॉलसहीत रेस्टॉरन्ट उघडले गेले आहेत. केंद्र सरकारने 8 जूनपासून देशभरात काही गोष्टींची सूट देण्याची घोषणा केली होती. मात्र, काही हेल्थ एक्सपर्ट्सना भीती आहे की, रेस्टॉरन्ट उघडल्यावर कोरोना व्हायरस आणखी वेगाने पसरू शकतो.  रेस्टॉरन्टमध्ये हात धुणे, मास्क घालणे आणि सरफेसला स्पर्श न करणे याशिवायही अशा काही गोष्टी आहेत ज्यांद्वारे तुम्ही कोरोनापासून बचाव करू शकता.

1) इन्फेशिअस डिजीज फिजिशिअन डॉक्टर शिरा डॉरोन यांनी कोणत्याही बाहेरील किंवा अनोळखी व्यक्तीसोबत जेवण करण्याचा सल्ला दिलाय.

(Image Credit : theatlantic.com)

2) कमी ताप आणि घशात खवखव सारखी हलकी लक्षणे असल्यावरही लोक बाहेर जाऊन खाण्याचा आनंद घेतात. पण जरासा बेजबाबदारपणा तुमच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे जराही लक्षणे दिसली तर बाहेर जाऊ नका.

(Image Credit : freepik.com)

3) सामान्यपणे लोक बाजूच्या टेबलवर बसलेल्या लोकांना टिश्यू पेपर किंवा मीठ पास करण्यास सांगतात. पण कोरोना आपल्या आजूबाजूला असताना या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कोरोनाच्या भीतीने जास्तीत रेस्टॉरन्ट चांगल्या प्रकारे सॅनिटाइज केले जातात. पण बाहेरून आलेली एक व्यक्ती तिथे संक्रमण पसरवू शकतो. ज्याची लागण तुम्हालाही होऊ शकते.

4) रेस्टॉरन्ट किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्याआधी काही गोष्टी ठरवा. रेस्टॉरन्ट इत्यादीच्या दरवाज्यावर शरीराचं तापमान तपासण्याची सुविधा असावी. एन्ट्री गेटवर मास्क, हॅंड वॉश आणि सोशल डिस्टंसिंगची गाइडलाईन्स असावी. 

5) रेस्टॉरन्टमध्ये नेहमीच्या आवडत्या जागेवर बसण्याचे दिवस आता गेलेत. कोरोना काळात रेस्टॉरन्ट हळूहळू लोकांना स्पेस देत आहेत. पहिल्या टप्प्यात रेस्टॉरन्टमध्ये केवळ 25 टक्केच सिटींग स्पेस असू शकते. नंतर ते वाढवतील.

6) अमेरिकेप्रमाणे येथील रेस्टॉरन्टही ग्राहकांना ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून बोलवू शकतात. जेणेकरून तिथे एकदम लोकांची गर्दी होऊ नये. यादरम्यान तुम्हाला वेटींग लिस्टमध्ये राहून संयम ठेवावा लागेल.

7) या क्षणाची तुम्हाला काही महिने वाट बघावी लागली आहे. पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही रेस्टॉरन्टमध्ये विनाकारण बसायला जावं. कोरोना व्हायरस अजून आपल्यातून गेलेला नाही. गर्दीच्या ठिकाणी जाल तर तुम्हाला त्याची लागण होऊ शकते.

आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

रोजच्या चुकांमुळे कमी होत आहे रोगप्रतिकारकशक्ती; माहीत करून घ्या आहाराबात 'या' गोष्टी

Web Title: Unlock 1.0 : Mistakes to avoid at a reopened restaurant after corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.