आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 10:29 AM2020-06-09T10:29:36+5:302020-06-09T10:35:46+5:30

अशा स्थितीत विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी माऊथवॉशचा वापर परिणामकारक ठरू शकतो.

Mouthwash that can help prevent transmission of covid19 says study | आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.

आता माऊथ वॉशच्या वापराने टाळता येणार कोरोनाचा संसर्ग; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत.

googlenewsNext

कोरोना व्हायरसची माहामारी संपूर्ण जगभर पसरलेली असताना आता लॉकडाऊन उठवलं जात आहे.  अशा स्थितीत कोरोनासोबत जगत असताना जीव मुठीत घेऊन जगावं लागणार आहे. कारण कोरोना विषाणूंचा संसर्ग कधीही होऊ शकतो. कोरोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायजरचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार माऊथवॉशसुद्धा मास्कप्रमाणेच  कोरोनापासून तुमचा बचाव करू शकतो.  कोरिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे. जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्समध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

दरम्यान लाळेमार्फत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो. कोरोनाबाधित व्यक्तींच्या शिकंण्यातून खोकण्यातून किंवा बोलण्यातून संसर्ग झाल्यास संक्रमण पसरण्याचा धोका असतो. अशा स्थितीत विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी माऊथवॉशचा वापर परिणामकारक ठरू शकतो. क्लोरहेक्सिडीन माऊथवॉशमुळे काही तास लाळेतील कोरोना व्हायरसचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. 

माऊशवॉशने गुळण्या केल्यास लाळेतील व्हायरसचं प्रमाण  २ तासासाठी कमी होतं. त्यामुळे व्हायरसच्या प्रसारचा धोका कमी होतो. त्यामुळे होम क्वारंटाईन असलेल्यांनी, बाहेरून आलेल्या व्यक्तींनी, रुग्णांनी  दर १ ते २ तासांनी माऊवॉशने तोंड स्वच्छ करावे. शिवाय डेंटिस्ट, ईएनटी, ऑप्थमोलॉजी आणि फिजिशिअन्सनीदेखील त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना माऊथवॉशने गुळण्या करून येण्याचा सल्ला द्यायला हवा. जेणेकरून आरोग्य विभागातील व्यक्तींना रुग्णांमुळे संक्रमणाचा धोका उद्भवणार नाही.  

समाधानकारक! कोरोना विषाणू 'या' तीन औषधांच्या मिश्रणाने होणार नष्ट; भारतातील तज्ज्ञांचा दावा

रोजच्या चुकांमुळे कमी होत आहे रोगप्रतिकारकशक्ती; माहीत करून घ्या आहाराबात 'या' गोष्टी

Web Title: Mouthwash that can help prevent transmission of covid19 says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.