हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 06:41 IST2026-04-26T06:39:57+5:302026-04-26T06:41:14+5:30

टोफूमधील अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरात तयार होणारे फ्री रेडिकल्स नष्ट होण्यास मदत होते आणि वृद्धत्व लांबविता येते, तसेच वय कमी दिसते.

Tofu is high in protein and contains all the essential amino acids your body needs | हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान

हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान

प्रो. डॉ. जया विकास कुऱ्हेकर
सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया

तुम्ही मांसाहारी नाही? मग मांसाहाराइतकाच, किंबहुना अधिक गुणकारी आणि प्रथिनेयुक्त टोफू हा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा नक्कीच लाभ घ्या!
टोफू हा सोयाबीन्सच्या दुधातून बनविलेला पनीर आहे, जो कॅल्शियम आणि प्रथिने यांनी ओतप्रोत आहे. त्याला ‘बीन कर्ड’ असेही म्हणतात. त्याची स्वतःची अशी विशिष्ट चव असते, ज्यामुळे त्याचा वापर गोड आणि तिखट अशा दोन्ही पदार्थांमध्ये करता येतो. तो छिद्रमय असल्यामुळे त्याची शोषण शक्ती जास्त असते आणि म्हणूनच कोणत्याही पदार्थात वापरण्याआधी त्याला विविध प्रकारे मेरिनेट अर्थात मसाले किंवा दही लावून किंवा लिंबाचा रस लावून ठेवता येते, ज्यामुळे त्यात चव विकसित होते.

नेमके काेणते परिवर्तन घडवतो ?

मानवी शरीरामध्ये टोफू कॅल्शियम आणि प्रथिनांचे संतुलन राखतो. अगदी लहान खेळण्याच्या वयातील मुलांपासून ते गर्भवती महिला, जीममध्ये घाम गाळणाऱ्या व्यायामप्रिय व्यक्तींसाठीदेखील हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. टोफूमुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि ट्रायग्लिसराइडची शरीरातील मात्रा कमी होण्यास मदत होते. 

टोफूमधील अँटिऑक्सिडंटस्मुळे शरीरात तयार होणारे फ्री रेडिकल्स नष्ट होण्यास मदत होते आणि वृद्धत्व लांबविता येते, तसेच वय कमी दिसते. भरपूर प्रमाणात टोफूचे सेवन केल्यास ब्रेस्ट कॅन्सर, हृदयरोग आणि ऑस्टियोपरोसिस यासारख्या जीवघेण्या आजारांना प्रमाणात रोखता येते. टोफू मांसपेशींना आणि हाडे मजबूत करण्यात मदत करते. विशेष म्हणजे त्यात कॅलरीज कमी असतात; परंतु, लोह मात्र जास्त प्रमाणात असते.

शाकाहारी व्यक्तींसाठी वरदानच...
शाकाहारी व्यक्तींसाठी टोफू हे एक वरदान आहे, असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. त्यात मांसामध्ये आढळणारी सगळीच प्रथिने आहेत. नियमितपणे, तसेच आवश्यक त्या मात्रेत टोफूचे सेवन केल्यास मांसाहारी व्यक्तींपेक्षाही जास्त प्रथिनांचे प्रमाण पोटात जाते. मांसपेशींना जलद गतीने विकसित होण्यासाठी लागणारी अमिनो ॲसिड्स आणि आयसोफ्लेवोनिनस टोफूमध्ये अस्तित्वात असतात. टोफू प्रथिनांचा एक उत्तम स्रोत ठरला आहे. अर्धा कप टोफूमध्ये १० ग्रॅम प्रथिने मिळतात, ज्यातून ८८ कॅलरी ऊर्जा मिळते, तसेच झिंक, लोह, सेलेनियम, पोटॅशियम आणि काही विशिष्ट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सदेखील टोफूमधून मिळतात.  अशा या बहुगुणी टोफूचा रोजच्या आहारात समावेश करण्यास काहीच हरकत नाही.

Web Title : टोफू: अनोखे लाभों के साथ स्वास्थ्य के लिए शाकाहारी वरदान।

Web Summary : टोफू, एक प्रोटीन युक्त सोयाबीन दही, सभी उम्र के लिए फायदेमंद है। यह कोलेस्ट्रॉल कम करता है, मुक्त कणों से लड़ता है, और बीमारियों को रोक सकता है। आधा कप 10 ग्राम प्रोटीन और आवश्यक खनिज प्रदान करता है, जो इसे शाकाहारी सुपरफूड बनाता है।

Web Title : Tofu: A vegetarian boon for health, offering unique benefits.

Web Summary : Tofu, a protein-rich soybean curd, benefits all ages. It lowers cholesterol, fights free radicals, and may prevent diseases. A half-cup serving provides 10 grams of protein and essential minerals, making it a vegetarian superfood.

टॅग्स :Healthआरोग्य