शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सतत काम केल्यामुळे डोळे थकले आहेत?; असा द्या आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:55 IST

सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात.

सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. तज्ज्ञांच्या मते, सतत डोळ्यांचा वापर करण्यापेक्षा उत्तम पर्याय म्हणजे, डोळ्यांना आराम देणं. जर तुमच्याही डोळ्यांना सतत काम करून थकवा जाणवत असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांमुळे डोळे रिलॅक्स होण्यास मदत होइल. 

का थकतात डोळे?

डोळ्यांना थकवा जाणवणं एक सामान्य गोष्ट आहे. जर तुम्ही सतत वाचत असाल तर तुमचेही डोळे थकतात. याव्यतिरिक्त ऑफिसमध्ये सतत कंम्प्युटर स्क्रिनसमोर काम केल्यानेही डोळे थकतात. शॉपिंगपासून चॅटिंगपर्यंत मोबाइलवर अवलंबून राहिल्यामुळे आपल्या डोळ्यांना लाइटचा सामना करावा लागतो. ज्याचा त्यांच्यावर अत्यंत धोकादायक परिणाम होतो. या असतात समस्या

डोळ्यांना सर्वात जास्त जाणवणारी समस्या म्हणजे, धुरकट दिसणं. झोप पूर्ण न झाल्यामुळेही जर डोळ्यांना काम करावं लागलं तर ते लाल होतात. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा धूळ गेल्यामुळे डोळे लाल होतात. तसेच गॅजेट्सच्या प्रखर किरणांमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवू लागतो. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व समस्यांवर वेळीच उपचार केले नाहीत तर मात्र डोळ्यांची दृष्टी कम होण्याची शक्यता असते. 

डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी हे उपाय ठरतात फायदेशीर

जर तुम्ही सतत वाचन करत असाल तर तुम्हाला डोळ्यांसाठी पेन एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. यामध्ये पेन किंवा पेन्सिल डोळ्यांच्या समोर हाताच्या अंतरावर ठेवा. त्यानंतर डाव्या आणि उजव्या बाजूला हळूहळू फिरवून त्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे डोळ्यांच्या व्यायाम होतो पण हा व्यायाम सकाळी करणं फायदेशीर ठरतं. कारण त्यावेळी डोळे थकलेले नसतात.

जर डोळ्यांना काम केल्यामुळे थकवा जाणवत असेल तर त्यांना लगेच आरामाची गरज असते. त्यासाठी डोळे बंद करून बसा. 10 मिनिटांपर्यंत यांना हाताच्या तळव्याच्या मदतीने बंद करा. डोळ्यांच्या बुबुळांवर दबाव नका टाकू. यामुळे डोळे रिलॅक्स होतील. कम्प्यूटरवर जर सतत काम करणार असाल तर ही एक्सरसाइज ट्राय करा. 

प्रदूषण, कम्प्यूटर आणि टिव्हीची प्रखर किरणं, झोपण्याच्या आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी, या सर्व आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत हानिकारक असतात. विजन योगा केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. तसेच डोळ्यांच्या मसल्सचा वर्कआउट होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स