Tips to Overcome Hangover: नव्या वर्षाची पार्टी, वेकेशननंतरच्या हँगओव्हरपासून कसं वाचाल? या आहेत टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 10:28 IST2023-01-02T10:27:25+5:302023-01-02T10:28:11+5:30
सर्व सेलिब्रेशननंतर होतो तो हँगओव्हर. हँगओव्हर फक्त मद्यपींनाच होत नाही. सुट्टीच्या दिवशीही हँगओव्हर होतात. त्यामुळे सुट्टीवरून परत आल्यावर लोकांना काम करावेसे वाटत नाही.

Tips to Overcome Hangover: नव्या वर्षाची पार्टी, वेकेशननंतरच्या हँगओव्हरपासून कसं वाचाल? या आहेत टीप्स
ख्रिसमसपासून नवीन वर्षांपर्यंत पार्टी चालते. लोक सुट्टीवर जातात. म्हणजे पार्टी मोड सुरू, वर्क मोड बंद. वाईन आणि व्हिस्कीशिवाय अशी पार्टी आणि सुट्टी पूर्ण होत नाही हे उघड आहे. या सर्व सेलिब्रेशननंतर होतो तो हँगओव्हर. हँगओव्हर फक्त दारू पिणाऱ्यांनाच होत नाही. सुट्टीच्या दिवशीही हँगओव्हर होतात. त्यामुळे सुट्टीवरून परत आल्यावर लोकांना काम करावेसे वाटत नाही.
आज आपण गरजेच्या गोष्टी दोन भागात विभागणार आहोत. आपण ड्रिंकनंतर हँगओव्हरशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू आणि नंतर हॉलिडे मूडला कामाच्या मूडमध्ये कसं रिचार्ज करायचं ते पाहू. दैनिक भास्करशी संवाद साधताना दिल्लीतील जनरल फिजिशियन डॉ. अनुपम वस्तल आणि डॉ. कामना छिब्बर, सायकेट्रिस्ट, फोर्टिस रुग्णालय, गुरुग्राम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
जेव्हा तुम्ही पार्टी करता आणि ड्रिंक घेता, तेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ठीक वाटत नाही. काही लोकांना डोकेदुखी, थकल्यासारखं वाटणं अशा काही समस्या जाणवतात. ड्रिंक्समधून होणाऱ्या या इफेक्ट्सना हँग ओव्हर म्हणतात असं त्यांनी सांगितलं. रिकाम्या पोटी मद्याचं सेवन, पाण्याशिवाय मद्याचं सेवनं, मद्यात असलेल्या कॉन्जेनर्समुळे आणि मर्यादेपेक्षा अधिक मद्याचं सेवन केल्यास हँग ओव्हर होऊ शकते.
हँगओव्हर उतरवण्यासाठी काय कराल?
केळं खा - केळं शरीरातील इलेक्ट्रोलाईन उत्तम ठेवतो. शरीरातील इलेक्ट्रोलाईट कमी झाल्यानंतर थकल्यासारखं वाटणं, डोकेदुखी, क्रँप येणं, उत्साह कमी होणं अशा समस्या होतात.
कॉफी प्या - थॉमस जेफरन युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणानुसार हँगओव्हर कमी करण्यासाठी कॉफी किंवा चहाचं सेवन योग्य ठकतं. याशिवाय सिट्रिक फळ खाणंही फायदेशीर ठरतं.
लिंबू पाणी प्या - हँगओव्हर कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्या. त्यामुळे हँगओव्हर कमी होण्यास मदत मिळते.
दही खा - दही शरीरातील बॅड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरियामध्ये बदलतं. यामुळे हँगओव्हर कमी होतो
नारळ पाणी प्या - नारळ पाण्यातही इलेक्ट्रोलाईट्स असतात. ते शरीराला हायड्रेट करतात.
मोठ्या सुट्टीनंतर जर तुम्ही पुन्हा कामावर रुजू होता, तेव्हा जर तुम्हाला पोस्ट व्हेकेशन सिंड्रोम होत असेल तर पाहा तुम्ही कसं तुम्हाला चार्ज करू शकता.
सुट्टीवर जाणं किंवा दैनंदिन जीवनात ब्रेक घेमं तुमच्या आयुष्यात मोठा बदल ठरू शकतं. मोठ्या ब्रेकनंतर अनेकदा तुम्हाला पुन्हा जाऊ नये असं वाटतं. असं वाटणं तर सामान्यच आहे. परंतु जेव्हा तुम्हाला परत ज्या ठिकाणी फिरायला गेला होता त्याच जागी जावंसं वाटतं, तेव्हा त्याला पोस्ट व्हेकेशन ब्लूज किंवा पोस्ट व्हेकेशन डिप्रेशनच्या रुपात पाहिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याला पोस्ट व्हेकेशन सिंड्रोम म्हणतात.
मोठ्या सुट्टीनंतर एका सामान्य व्यक्तीला नॉर्मल होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. परंतु आपण तीन दिवसांच्या आत आपलं रुटीन फॉलो करायला लागतो. जर तुम्ही सु्ट्टीत कोणत्या दुसऱ्या देशात गेला असाल तर जेट लॅगमुळे अनेकदा तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होते. मोठ्या सुट्टीनंतर जेव्हा तुम्हाला आरोग्याची समस्या निर्माण होते तेव्हा व्यायाम करा आणि ॲक्टिव्ह राहा. कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका आणि मेडिटेशन करा.