शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

सणांच्या काळात तेलात होत असणारी भेसळ कशी ओळखाल? FSSAI ने उघड केले सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 13:15 IST

सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? 

सण उत्सवाच्या काळामध्ये तेलाची आवश्यकता खूप जास्त असते. त्यामुळे आपण बऱ्याचदा घाऊक दरात तेल खरेदी करतो. सध्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता तेलामध्येही भेसळत होत आहे. तुम्ही घरी आणलेलं तेल शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं? 

सणासुदीच्या काळात तेलात भेसळीच्या तक्रारीही वाढतात. खरं तर, भेसळयुक्त तेलाचा रंग पिवळा करण्यासाठी, त्यात घातक मेटानिल यलो वापरलं जातं. जे आपल्यासाठी खूप घातक असतं. आपल्या घरी आणलेलं तेल भेसऴयुक्त आहे की नाही हे ओळखायचं कसं याची माहिती चक्क FSSAI ने ट्वीटरवरून दिली आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तेलातील भेसळीविरोधात ट्विटरवर Detecting Food Adulterants नावाची मोहीम सुरू केली. भेसळयुक्त तेल जास्त काळ खाणे आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. एफएसएसएआय या मोहीमेअंतर्गत लोकांना घरी अन्न भेसळ कशी तपासायची हे सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की FSSAI ने खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखायची ते सांगितलं आहे.

पहिल्यांदा टेस्टट्यूबमध्ये १ मिली तेलाचा नमुना घ्याया तेलाच्या नमुन्यामध्ये ४ मिली डिस्टिल्ड वॉटर मिसळा त्यानंतर ही ट्यूब हलवत राहाया एकत्र केलेल्या मिश्रणाला २ मिली दुसऱ्या टेस्टट्यूबमध्ये घ्या 2l कंसेंट्रेटेड HCL मिसळाआता तुम्हाला भेसळयुक्त केलेला पदार्थ वर तरंगताना दिलेलजर तेल भेसळयुक्त नसेल तर तेलावर तरंग येणार नाहीभेसळयुक्त तेलातील वरच्या थराचा रंग बदलला याचा अर्थ तुमच्या तेलात भेसळ आहे

मेटॅनिल यलो हा खाद्य रंग आहे जो भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेटॅनिल यलो मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. तो आपल्या मेंदूच्या क्षमतेवर परिणाम करतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स