दाढीची फॅशन इन! मग जाड, घनदाट दाढीसाठी तुम्ही काय करताय? फॉलो करा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:49 PM2021-12-10T14:49:54+5:302021-12-10T18:03:34+5:30

मुलंही वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात जेणेकरून त्यांना दाढीचा परफेक्ट लूक देता येईल. पण काही मुलांची दाढी जनुकीयदृष्ट्या कमी वाढते, तर काहींना चुकीच्या आहारामुळे दाढी न वाढण्याची समस्या असते. अशा परिस्थितीत, त्यांना त्यांच्या दाढीच्या लूकबद्दल काळजी वाटते.

tips to grow beard for men | दाढीची फॅशन इन! मग जाड, घनदाट दाढीसाठी तुम्ही काय करताय? फॉलो करा 'या' टिप्स

दाढीची फॅशन इन! मग जाड, घनदाट दाढीसाठी तुम्ही काय करताय? फॉलो करा 'या' टिप्स

googlenewsNext

एक काळ असा होता की मुलं सलूनमध्ये जाऊन दाढी करण्यासाठी पैसे खर्च करत असत. पण आजकाल फॅशन बदलली आहे. जाड दाढी-मिशी ठेवण्याचा तरुणांचा ट्रेंड झाला आहे. यासाठी मुलंही वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात जेणेकरून त्यांना दाढीचा परफेक्ट लूक देता येईल. पण काही मुलांची दाढी जनुकीयदृष्ट्या कमी वाढते, तर काहींना चुकीच्या आहारामुळे दाढी न वाढण्याची समस्या असते. अशा परिस्थितीत, त्यांना त्यांच्या दाढीच्या लूकबद्दल काळजी वाटते.

तुम्हालाही तुमच्या दाढीची काळजी वाटत असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही दाढी घनदाट वाढवू शकता. यामुळे तुमचं आरोग्य तर राहिलच पण तुमच्या दाढीची वाढही चांगली होऊ शकते.

दालचिनी :- दालचिनी मसाला प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतो. जेवणात चव वाढवण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. यासाठी दालचिनी आणि लिंबाची पेस्ट बनवून दाढीवर लावा. तुम्हाला हवे असल्यास गरम पाण्यासोबत मध आणि दालचिनीचे सेवनही करू शकता. असे केल्याने दाढी घट्ट होण्यास मदत होऊ शकते.

पालक
पालक आरोग्यासाठी खूप चांगला मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, आयर्न मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे दाढी घट्ट होण्यास मदत होते. दाढीच्या केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही तुमच्या आहारात पालकाचा समावेश केला पाहिजे. पालकाच्या ज्यूसचेही सेवन करू शकता.

भोपळा बिया
भाजी करताना बहुतेक लोक भोपळ्याच्या बिया फेकून देतात. पण केसांच्या वाढीसाठी या बिया खूप फायदेशीर मानल्या जातात. यासाठी भोपळ्याचे दाणे उन्हात चांगले वाळवावेत. त्यानंतर ते भाजून त्यात मीठ मिसळून सेवन करा.

कांद्याचा रस
कांद्याचा रस दाढी घनदाट होण्यास मदत करेल. यासाठी प्रथम कांद्याचा रस काढा. त्यानंतर त्यात एरंडेल तेल किंवा पाणी 2-3 थेंब घाला. आता दाढीच्या भागावर लावा आणि काही तास असेच राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

Web Title: tips to grow beard for men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.