पावसामुळे हैराण करणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून सुटका झाली असली तरिही अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. पावसामध्ये अनेक वातावरणामध्ये अनेक बॅक्टेरिया वाढत असतात. त्यांच्यासोबतच अनेक आजारही आपली डोकी वर काढत असतात. अशातच घरासोबतच किचनमध्येही उबट वातावरण तयार होतं. पण काही टिप्स फॉलो करून तुम्ही मान्सूनमध्ये किचन स्वच्छ ठेवण्यासोबतच तिथे ठेवलेल्या सर्व गोष्टींचं ओलाव्यापासून बचाव करू शकता. 

येथे काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला उपयोगी पडू शकतात :

1. सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्या की, किचनमध्ये जर तुम्ही लादी पुसणार असाल तर कापड एकदम पिळून लावा. तसेच लादी पुसण्यासाठी घेतलेल्या पाण्यामध्ये तुम्ही थोडसं फिनॉइल एकत्र करू शकता. यामुळे किचनच्या लादीवर ओलावा राहणार नाही, तसेच फिनॉइलचा वापर केल्यामुळे किटकही येणार नाहीत. 

2. पावसाळ्यामध्ये किचनमध्ये कॉक्रोच आणि इतर किटक वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे किचनमध्ये जेवण तयार करून झाल्यानंतर एकादं किटनाशकाचा वापर करू शकता. जेव्हा किचनमधअये काहीही काम नसेल तेव्हा किटकनाशक औषधाचा वापर करून थोडा वेळासाठी तसंच ठेवा. पण यादरम्यान खाण्याच्या गोष्टी व्यवस्थित झाकून ठेवा. तसेच तुम्ही औषध हाताळताना योग्य ती काळजी घ्या. 

3. पापड आणि चिप्स इत्यादी यांसारख्या पदार्थांमध्ये पावसाळ्यामध्ये ओलावा येतो. यासाठी हे सर्व पदार्थ एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. तसेच तळण्याआधी काही वेळ फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा. 

4. मान्सूनमध्ये मसाल्यांमध्येही ओलावा येतो. त्यासाठी मसाले एयर टाइट डब्यांमध्ये ठेवा. बारिक केलेले मसाले स्टोअर करून ठेवताना त्यामध्ये लवंगाचे दोन तुकडे ठेवा. 

5. किचनमध्ये भाज्या कापण्यासाठी असणाऱ्या चॉपिंग बोर्डची स्वच्छता दररोज करणं आवश्यक असतं. पण पावसाळ्यामध्ये विशेष सफाई करणं गरजेचं असतं. अशातच वातावरणामध्ये चॉपिंग बोर्डला लिंबू आणि बेकिंग सोड्यासोबत स्वच्छ करा. त्यामुळे त्यावरील सर्व बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होईल. 

6. किचनच्या खिडक्या व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्या ओपन करून ठेवा. त्यामुळे किचनमध्ये ओलावा राहिल आणि त्याचा गंधही येणार नाही. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआदी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: Tips to clean kitchen in monsoon and protect things from getting moist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.