Jaggery and til benefits : थंडीच्या दिवसात लोक मोठ्या आवडीने गूळाचं सेवन करतात. कारण यातील पोषक तत्वांमुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं. यासोबतच यात आयरनचं प्रमाण जास्त असतं. या कारणानेही याचा डाएटमध्ये समावेश करावा. जास्तीत जास्त लोक गूळ चण्यांसोबत खातात. पण हिवाळ्यात तुम्ही याचं सेवन तिळासोबत करू शकता. याने तुम्हाला जास्त फायदा मिळेल. ज्या लोकांच्या शरीरात रक्त कमी आहे त्यांनी नक्की याचं सेवन करावं. चला जाणून घेऊन या दोन गोष्टींमधील पोषक तत्व आणि त्याचे फायदे.
गूळाचे पोषक तत्व - कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयरन आणि लोह व झिंक तसेच तांबे यात असतं. व्हिटॅमिनमध्ये फोलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असतात.
तिळातील पोषक तत्व - तिळामध्ये कॉपर, मॅगनीज, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशिअम, लोह, झिंक, मोलिब्डेनम, व्हिटॅमिन बी 1, सेलेनियम आणि डायट्री फायबर सारखे पोषक तत्व असतात.
- ब्लड शुगर कंट्रोल (blood sugar control) करण्यास या दोन्ही गोष्टी फार मदत करतात. सोबतच याने तुमची हाडेही मजबूत होतात. त्याशिवाय तुमच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं होतं. तुम्ही तिळ आणि गूळापासून तयार एक लाडू रोज खावा. याने थंडीच्या दिवसात खूप फायदा मिळेल. याने शरीराला उष्णता मिळेल, ज्यामुळे शरीर व्हायरल इन्फेक्शनच्या जाळ्यात येणार नाही.
- या दोन्ही गोष्टी सोबत खाल्ल्याने तुमचं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. हे पोटासाठीही चांगलं असतं. हिवाळ्यात याने सुरक्षा मिळते. कारण दोन्ही गोष्टी उष्ण आहेत. एनीमियाच्या रूग्णांनी जर आवर्जून याचा डाएटमध्ये समावेश करायला हवा. याने दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या तणावही दूर होतो. तिळामुळे तुमच्या शरीराचा एलर्जीपासूनही बचाव होतो. तसेच हे हृदयासाठीही फायदेशीर आहेत.