Dengue News: डेंग्यूपेक्षा अधिक धोकादायक आहेत डेंग्यूशी संबंधित हे दोन आजार, केवळ एका दिवसात होतोय मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 19:39 IST2021-09-17T19:35:49+5:302021-09-17T19:39:20+5:30
Dengue News: चिंतेची बाब म्हणजे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये एक नवा ट्रेंड दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या तापापेक्षा डेंग्यूशी संबंधित दोन आजार अधिक धोकादायक ठरत आहेत.

Dengue News: डेंग्यूपेक्षा अधिक धोकादायक आहेत डेंग्यूशी संबंधित हे दोन आजार, केवळ एका दिवसात होतोय मृत्यू
नवी दिल्ली - देशात डेंग्यूचा प्रकोप वाढत चालला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयामध्ये दाखल होत आहे. तर शंभरहून अधिक मुलांचा आणि प्रौढांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. (Dengue News) त्यामुळे या आजाराने तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यातही चिंतेची बाब म्हणजे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये एक नवा ट्रेंड दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते डेंग्यूच्या तापापेक्षा डेंग्यूशी संबंधित दोन आजार अधिक धोकादायक ठरत आहेत. त्यामुळेच यावेळी हा आजार अधिक जीवघेणा ठरत आहे आणि रुग्णांचा आकडा वाढत आहे. (These two diseases related to dengue are more dangerous than dengue, death occurs in just one day)
एसएन मेडिकल कॉलेज आग्रा येथे डेंग्यूचे नोडल अधिकारी असलेले प्राध्यापक मृदुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, डेंग्यूचे जे रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, डेंग्यूच्या तापामुळे लोकांचा किंवा मुलांचा मृत्यू झालेला नाही तर डेंग्यूची पुढची स्टेज म्हणजेच डेंग्यू संबंधित दोन आजार डेंग्यू शॉक सिंड्रोम आणि डेंग्यू हेमरेजिक फिव्हर हा यामधील बहुतांश मृत्यूंसाठी कारणीभूत आहे.
एसएन मेडिकल कॉलेजमध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातून रेफर होऊन येणारे बहुतांश रुग्ण हे असेच आहेत. त्यांच्यामध्ये हे दोन आजार दिसून येत आहेत. मात्र डेंग्यूच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला पोहोचल्यावर आणि पुरेसे उपचार न मिळाल्याने स्थानिक पातळीवर या आजारांमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे.
प्रा. चतुर्वेदी सांगतात की, कोविडप्रमाणेच डेंग्यूचाही कुठलाही स्पष्ट इलाज सापडलेला नाही. मुख्यत्वेकरून रुग्णामध्ये डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर लक्षणांच्या आधारावर उपचार केले जातात. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. तसेच त्यावर लक्ष ठेवून रुग्णालान आहार आणि औषधांची योग्य ती मात्रा दिली जाते.