शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

'या' लोकांनी तुप खाल्ल्यास उद्भवु शकतात गंभीर धोके, समजल्यावर तुपाला शिवणारही नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 17:00 IST

तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो.

भारतीय आहारपद्धतीत तुपाला (Ghee) विशेष महत्त्व आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या तुपात घालून आयुर्वेदातील अनेक औषधं घेतली जातात. शिरा, खिचडी, पुरणपोळी, वरण-भात, पराठे अशा अनेक पदार्थांबरोबर भरपूर तूप खायला आवडणारी अनेक मंडळी असतात. इतकंच काय आमरस बाधू नये म्हणून त्यातही तूप घालून खाण्याची पद्धत आहे. तुपाचे इतके फायदे असूनही काही जणांना तूप खाण्याचा त्रास होऊ शकतो. तूप खाणं कोणासाठी हितकारक असतं व कोणाला त्याचा त्रास (Side Effects Of Ghee) होऊ शकतो, याबाबत एनडीटीव्ही इंडियानं एक वृत्त दिलं आहे.

आयुर्वेदात तूप खाण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. दररोज जेवणात योग्य प्रमाणात तूप खाणं गरजेचं असल्याचं यात म्हटलंय. तूप इतकं आरोग्यकारक असूनही सरसकट सर्वांसाठी तूप खाणं योग्य ठरत नाही. तूप पचनासाठी जड असतं. काही जणांना रेचक म्हणून तूप खायला सांगितलं जातं. मात्र ज्यांना अपचनाची (Digestion Problem) समस्या आहे, त्यांच्या शरीरावर तुपाचं सेवन विपरित परिणाम करतं. तुम्हाला अपचनाची आणि पोटाची जुनाट समस्या असेल, तर तुपाचं सेवन जास्त करू नका. गरोदरपणात पोट फुगणं, अपचन अशा समस्या महिलांना जाणवतात. त्या काळात सर्दी किंवा पोट खराब झालं, तर तूप खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

आयुर्वेदानुसार तूप कफ वाढवणारा पदार्थ आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्यामुळे ताप आला असेल, तर तूप खाणं योग्य ठरत नाही. पावसाळ्यात लगेच घसा धरतो व सर्दी होते. अशावेळी काही काळासाठी तुपाचं सेवन कमी करावं. तसंच यकृत आणि प्लिहासंबंधी (Liver And Spleen Diseases) काही आजार असतील, तर आहारातून तूप पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.

तुपामुळे चरबी वाढत नाही हे खरं असलं तरी तुपाचं अतिरेकी सेवन केल्यानं वजन वाढून लठ्ठपणाचा त्रास होऊ शकतो. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनीही तूप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जास्त तूप खाल्ल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. परिणामी, हृदयावर ताण येऊ शकतो. विकतच्या तुपापेक्षा घरगुती तूप अधिक चांगलं असतं. मात्र तूप खाताना ते प्रमाणातच खाणं गरजेचं असतं.

खरं तर तूप आहारात असावंच. त्यामुळे पचन नीट होतं. तूप त्वचेला उजाळा देण्यासाठी, मेंदूसाठी, स्मरणशक्तीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी अगदी उत्तम असतं. तुपाला सुपरफूड म्हटलं गेलं आहे. कारण विविध पदार्थांसोबत याचं सेवन केलं असता, त्याचे चांगले परिणाम शरीरावर दिसले आहेत. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत तुपाचा शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो. अशा व्यक्तींनी आहारातील तुपाचा वापर कमी केल्यास ते आरोग्यदायी ठरेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स