शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

खास पदार्थांपासून बनवलेली 'ही' हेल्दी ड्रिंक्स करतील तुमचा तणाव दुर, वाटेल फ्रेश अन् एनर्जिटीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 10:58 IST

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकता. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला स्ट्रेस, चिंता यापासून वाचवू शकतात आणि तुम्हाला लगेच बरे वाटू लागेल.

आजच्या वेगवान धावत्या जगात आपण तांत्रिकदृष्ट्या विकसित होत आहोत. परंतु, आपल्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक समस्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. चांगल्या जीवनशैलीच्या शोधात आपली तणाव पातळी नवीन उंचीवर पोहोचली आहे. मेड इंडियाच्या माहितीनुसार, तणाव आणि चिंता टाळण्यासाठी लोक अल्कोहोल किंवा ड्रग्सचा आधार घेत आहेत. हा एक धोकादायक ट्रेंड तर आहेच, परंतु औषधांवर अवलंबून राहण्याशिवाय तुम्हाला औषधांच्या प्रतिकूल परिणामांचा धोकाही आहे. नैसर्गिक मार्गांनी तणाव आणि अस्वस्थता दूर करणे हा सर्वोत्तम मार्ग (Drinks for Anxiety Relief) मानला जातो.

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकता. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला स्ट्रेस, चिंता यापासून वाचवू शकतात आणि तुम्हाला लगेच बरे वाटू लागेल.

कॅमोमाइल चहा -कॅमोमाइल चहा हा एक अतिशय लोकप्रिय हर्बल चहा आहे जो तणाव, चिंता आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे ओळखले जाते. मज्जासंस्था शांत करण्यासाठी, स्नायूंना आराम देण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यास याचा फायदा होतो. तयार करण्यासाठी गरम पाण्यात कॅमोमाइलची फुले घाला आणि तीन ते पाच मिनिटे सोडा आणि थंड किंवा कोमट करून प्या.

गरम दूध -जर तुम्ही रात्री कोमट दूध प्यायला तर दुधात असलेले अमिनो अॅसिड ट्रिप्टोफॅन जे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते आणि फील-गुड हार्मोन सोडण्यास मदत करते. ज्याच्या मदतीने आपल्याला तणाव किंवा चिंता यापासून आराम मिळतो.

चेरी रस -चेरीमध्ये मेलाटोनिन हा हार्मोन असतो, जो झोपेच्या चक्रांचे नियमन करण्यास मदत करतो. चांगली झोप घेतल्याने आपल्याला तणावापासून आराम मिळतो.

ग्रीन टी -ग्रीन टीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींचे होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात आणि आपल्या शरीराची आणि मेंदूची कार्ये सुधारतात. याच्या सेवनाने दुःख, नैराश्य, तणाव, चिंता कमी होते.

ओट स्ट्रॉ ट्री -ओट स्ट्रॉ हा ओट ब्रानपासून बनवला जातो, जो मानसिक थकवा आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो. चहा म्हणून प्यायल्यास बरे वाटेल.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य