बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास 'ही' ड्रिंक्स पिणं ठरतं घातक, कमी वयातच येऊ शकतो हार्ट ॲटॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:35 IST2024-12-18T12:37:39+5:302024-12-18T16:35:47+5:30
Bad Cholesterol : काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास 'ही' ड्रिंक्स पिणं ठरतं घातक, कमी वयातच येऊ शकतो हार्ट ॲटॅक!
Bad Cholesterol : आजकाल कमी वयातच लोक वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. अशात १८ वयातील तरूणांमध्येही लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉल सारख्या गंभीर समस्या बघायला मिळतात. पण ही विचार करण्यासारखी बाब आहे की, कमी वयात हाय कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगांचा धोका होण्याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर असं आहे की, काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
कोलेस्टेरॉल वाढवणारे ड्रिंक्स
आइसक्रीम ड्रिंक्स
आइसक्रीम सगळ्यांनाच आवडते. थंड आणि गोड आइसस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारची मिळते. बाजारात आइसस्क्रीम ड्रिंकही मिळतात. यांच्या सेवनाने बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वेगाने वाढू लागतं. जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.
मलाई-लोणीवाले ड्रिंक्स
केसर मलाई दूध, रबडी, लस्सी आणि छास टेस्टी बनवण्यासाठी अनेकदा दुकानांमध्ये मलाई आणि लोण्याचा अधिक वापर केला जातो. पण यांचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं.
हाय फॅट मिल्क
हाय फॅट मिल्कचं सेवन शरीरात फॅट आणि कोलेस्टेरॉल वाढवू शकतं. हाय फॅट तत्व धमण्यांमध्ये चिकटतात आणि यामुळे पुढे जाऊन ब्लॉकेजचा धोका वाढतो.
चहा आणि कॉफी
चहा आणि कॉफीमुळे हाय कोलेस्टेरॉलचा धोका अधिक वाढतो. कॉफीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, पण यात डायटरपीन तत्व असतं जे कोलेस्टेरॉलचं पचन करणाऱ्या पदार्थांचं उत्पादन कमी करतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं.
खोबरं आणि काजूचे ड्रिंक्स
खोबरं आणि काजूपासून तयार ड्रिंक्स इतके घट्ट असतात की, रक्तात शुगर वाढतात. सोबतच यानी फॅटचे कणही वाढतात, जे कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण ठरतात.