‘या’ सेलिब्रिटींचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले आहे निधन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:50 IST2017-07-28T08:18:03+5:302017-07-28T13:50:08+5:30
बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील असे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांचेदेखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...

‘या’ सेलिब्रिटींचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले आहे निधन !
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि अभिनेता इंदरकुमार यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४५ व्या वर्षी चार बंगला इथल्या निवासस्थानी निधन झाले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात असे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांचेदेखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...

* रिमा लागू
बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचेही निधन १८ मे २०१७ रोजी कार्डियक अरेस्टने झाले होते.

* संजीव कुमार
बॉलिवूड अभिनेता संजीव कुमार यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी झाला होता. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्याने ६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले होते.
* नवीन निश्चल
बॉलिवूड अभिनेता नवीन निश्चल यांचे निधन ६४ व्या वर्षी १९ मार्च २०११ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.

* विनोद मेहरा
बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन ३० आॅक्टोबर १९९० रोजी ४५ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.

* देव आनंद
बॉलिवूडचे सदाबहार हिरो देव आनंद यांचे निधन ३ डिसेंबर २०११ रोजी ८८ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते. ते त्यावेळी वॉशिंग्टन मेफेयर हॉटेलच्या खोलीत होते.
* ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती !

* माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन २७ जुलै २०१५ रोजी इंडियन इंस्टीट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये लेक्चर देत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.

* पं. जवाहर लाल नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला होता. त्यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने २७ मे १९६४ रोजी झाले होते.

* जयललिता
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन ६८ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे ५ डिसेंबर २०१६ रोजी झाले होते.

* मदर टेरेसा
नोबल आणि भारत रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मदर तेरेसा यांचा जन्म २६ आॅगस्ट १९१० रोजी झाला होता. त्यांचे निधन ८७ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.