शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

वजन कमी करण्याचे काही समज अन् बरेचसे गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 18:32 IST

आजच्या युगातला सगळ्यांना काळजी करायला लावणारा विषय 'वाढणारं वजन' हा आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांना हा प्रश्न भेडसावत असतो.वजन वाढणं हा एक आजार आहे.

- डॉ. नेहा पाटणकर

आजच्या युगातला सगळ्यांना काळजी करायला लावणारा विषय 'वाढणारं वजन' हा आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांना हा प्रश्न भेडसावत असतो.वजन वाढणं हा एक आजार आहे. याला आता वैद्यकिय भाषेमध्ये मान्यता मिळाली आहे आणि हे इतर आजार होण्यासाठीच्या  कारणांपैकी महत्वाचं कारण झालं आहे.

वजन कमी करणं खूप गरजेचं आहे याची आपल्याला जाणीव असते पण त्यासाठी नक्की काय करावं हे मात्र कळत नाही. कारण जो उठतो तो  छातीठोकपणे अत्यंत खात्रीलायक उपाय सांगत असतो. एवढचं नाहीतर वजन कमी करण्याच्या नवनवीन पद्धतींच्या जाहिरातींचा आपल्यावर सतत मारा होत असतो. असेच काही सल्ले आपण पाहूयात...

1. सकाळी उठून गरम पाण्यात मध/लिंबू घेणं -

गरम पाण्याने पोट साफ होतं आणि हलकं वाटतं. तसेच फक्त एवढंच करून वजन कमी होत नाही त्याच्या बरोबरीने दिवसभरात इतरही उपाययोजना करावी लागते.

2. ग्रीन टी/ग्रीन कॉफी दिवसभर सतत प्यायल्याने BMR (Basal Metabolic Rate) वाढतो -  

हा उपाय सगळ्यांना suit होतोच असं नाही. ज्यांना अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे त्यांना यामुळे खूप त्रास होऊ शकतो. त्याऐवजी जर दिवसभरात साध्या पाण्याऐवजी कोमट पाणी पिणं जास्त फायदेशीर ठरतं. 

3. फक्त सूप, कच्च्या भाज्या, फळं खाणं - 

या प्रकाराला VLDL 'व्हेरी लो कॅलरी डाएट' असं म्हणतात. यामुळे पटकन वजन कमी झालेलं दिसतं पण केस गळणं, त्वचेला सुरकुत्या पडणं, त्वचा कोरडी पडणं यांसारख्या समस्या उद्बवतात. याचं प्रमुख कारण म्हणजे, डाएटमुळे झालेली व्हिटॅमिन डेफिसिएन्सी.

4. बाजारात मिळणारी औषधं

एखादी मैत्रीण एखादं बाजारात विक्रीसाठी मिळणारं औषध घेऊन बारीक झालेली दिसते आपणही तेच घेऊन बारिक होण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे आपल्याला  मात्र अंगाला खाज किंवा पुरळ येतात. एकासाठी अमृत असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी विष ठरू शकते म्हणून दुसर्याचे अंधानुकरण न करता मला आणि माझ्या शरीराला काय उपयुक्त ठरेल ते वैद्यकीय सल्ला घेऊनच ठरवणं फायदेशीर ठरतं. 

5. प्रोटीन्समुळे फॅट्स बर्न होतात - 

कोणी किती प्रोटीन घ्यायचं याचं योग्य प्रमाण त्याचं वजन, फॅटचं वजन आणि स्नायूंचं वजन यावर अवलंबून असतं. तसेच प्रोटीनचे पचन होण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. त्यामुळे प्रोटीन व्यायाम करून वापरले नाही तर त्याचं फॅट्समध्ये रूपांतर होतं. BCA ही टेस्ट करून घेतली तर हे प्रमाण ठरवता येतं. 

6. कमी केलेलं वजन परत वाढतं -

एकदा वजन कमी केल्यानंतर आपण अनेकदा व्ययाम आणि डाएटकडे दुर्लक्षं करतो. त्यामुळे कमी झालेलं वजन पुन्हा वाढतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम वजन कमी झाल्यानंतरही सुरू ठेवावा.  

7. किटो(keto)डाएट, दिक्षित, वेगन डाएट, दिवेकर, मेडी टरेनियन यापैकी कुठे जाऊ?

या फॅड डाएटचा सुरुवातीला फायदा दिसतो. नंतर याचे बद्धकोष्ठता, लूज मोशन्स, हायपर ऍसिडिटी, व्हिटॅमिनची कमतरता असे दुष्परिणाम दिसू लागतात आणि शरीराला त्याची सवय होते. परिणामी वजन कमी होण्याची प्रक्रिया मंदावते. 

एकंदरीत, वजन कमी करण्याचा संकल्प केला की त्यात सातत्य ठेवण्यासाठी कुटुंबियांची मदत आणि सोशल सपोर्टची गरज असते. कुठलातरी उपाय ऐकून आपल्या शरीराची प्रयोगशाळा न बनवता तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या शरीराला रुचेल आणि पचेल अशाच मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स