(Image Credit : slumbr.com)
तुम्हाला हे माहीत असेलच की, चांगली झोप घेणे आरोग्यासाठी कशी फायदेशीर असते. चांगली झोप घेतल्याने तुम्ही तणावमुक्त तर व्हालच सोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठीही झोप फायदेशीर ठरते. पण तुमच्या झोपण्याशी निगडीत सवयीही वजन कमी करण्याची एक चांगली पद्धत आहे.
पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग्य डाएटची निवड करणे आणि जंक फूडपासून दूर राहणे फार गरजेचं आहे. त्यासोबतच एक चांगली झोप आणि झोपण्याशी निगडीत सवयी वजन कमी कशा करू शकतात, यावर फार कमी लोक विश्वास ठेवतात. चला जाणून घेऊ वजन कमी करण्यासाठी ३ सवयी ज्या तुम्ही बदलल्या पाहिजेत.
फोन बंद करा
जर तुम्ही प्रमाणापेक्षा अधिक स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करत असाल तर ही सवय तुम्ही मोडायला पाहिजे. कारण यातून निघणारी निळ्या रंगांची किरणे तुम्हाला प्रभावित करतात. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, बेडवर झोपायला जाण्याआधी निळ्या किरणांच्या संपर्कात आल्याने मेलाटोनिन बाधित होतात. मेलाटोनिन हार्मोन हे झोपेशी निगडीत आहेत.
शिकागोमधील इलिनोइसमध्ये नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी द्वारे केल्या गेलेल्या एका रिसर्चनुसार, जेव्हा मेलाटोनिनच्या निर्मितीत अडसर येतो, त्यामुळे भूक वाढते आणि मेटाबॉलिज्ममध्ये बदल होतो. याच कारणाने तुम्हाला वजन कमी करण्यात अडसर येतो, त्यामुळे नेहमीच मोबाइल बंद करून झोपणे फायद्याचं ठरतं.
अंधारात झोपा
जर तुम्ही नाइट लॅम्पमध्ये कमी प्रकाशात झोपणे पसंत करत असाल तुमची ही सवय लगेच बदला. याचं कारण निळ्या प्रकाशाप्रमाणेच नाइट लॅम्प किंवा बल्बच्या प्रकाशाने सुद्धा तुमच्या झोपेच्या हार्मोन्सच्या निर्मितीला अडचण येते. त्यामुळे नेहमी नाइट लॅम्प किंवा बल्ब बंद करूनच पूर्णपणे अंधारात झोपावे. तसेच स्लीप मास्क घालूनही तुम्ही झोपू शकता. जेव्हा तुम्ही अंधारात झोपता तेव्हा तुमचं मेटाबॉलिज्मही चांगलं राहतं.
सैल कपडे घालून झोपा
सैल कपडे घालून किंवा कपडे न घातला झोपल्याने झोपेची गुणवत्ता चांगली होते. आणि चांगल्या झोपेचे आरोग्याला अनेक फायदे होतात. जर तुम्ही कपडे न घालता झोपाल किंवा सैल कपडे घालाल तेव्हा तुम्हाला चांगली आणि शांत झोप येईल. एका रिसर्चनुसार, ५ तासांपेक्षा कमी झोपेमुळे पुरूष आणि महिला दोघांचंही वजन वाढतं आणि याने लठ्ठपणाचं कारण ठरतं.
म्हणजे एकंदर काय तर तुम्ही जर लठ्ठपणाचे शिकार असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचंय किंवा नियंत्रणात ठेवायचंय तर तुम्हाला चांगली झोप घ्यावी लागले. आणि चांगली झोप घेण्यासाठी वाईट सवयी मोडायला पाहिजे.