शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात द्राक्षे खाण्याचे खूप होतात फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:44 IST

उन्हाळ्यात सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात.

प्रत्येक ऋतूत फळे खाणे फायदेशीर असते. बदलत्या  ऋतुंप्रमाणे अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. विशेषत: उन्हाळ्यात फळे आपल्याला हायड्रेटेड तसेच ताजेतवाने ठेवतात. या काळामध्ये सर्वात जास्त मिळणाऱ्या फळांपैकी एक म्हणजे द्राक्ष. द्राक्ष खाण्याचे अगणित फायदे आहेत.  द्राक्षात देखील पुष्कळ पोषक घटक असतात. द्राक्षात फायबर, प्रथिने, लोह, तांबे, फोलेट, व्हिटॅमिन सी, ए, के आणि बी इत्यादी घटक असतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किती गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना माहितच असेल. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह असते. ही पोषकतत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो द्राक्ष खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाणे फायद्याचे आहे.

अनेक रोगांवर उपाय प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये द्राक्ष खाणे फायद्याचे आहे. द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. 

थकवा दूर होतोद्राक्षामध्ये व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि तांबे असतात. हे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामुळे थकवा दूर होतो.

हृदयरोगाशी संबधित समस्या दूर ठेवतेहृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही संशोधनातून असेही समोर आले आहे की, स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.

रक्ताची कमतरता दूर करतेद्राक्षात भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यावे.

माइग्रेनच्या समस्या कमी होतात सद्य काळात आपल्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे माइग्रेनच्या समस्येत वाढ झालेली आहे. आपल्यालाही मायग्रेनची समस्या असल्यास, आपण त्वरित द्राक्षे खाण्यास सुरवात केली पाहिजे. द्राक्षाचा रस पिणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काही दिवस तुम्ही द्राक्षाचा रस घेतल्यास तुम्हाला मायग्रेनच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळू शकेल.

डोळ्यांसाठी फायदेशीरद्राक्षातील पॉलीफेनोल्स आणि रेझेवॅटरॉल डोळ्यांच्या समस्या दूर करते. यात मॅक्युलर डीजनरेसन, ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि मोतीबिंदू इत्यादी डोळ्यांच्या समस्या दूर राहतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नfruitsफळे