शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

केळी खाल्ल्याने तोटेही होतात भरपूर; पाहा एकदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:26 IST

केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. पण जसे केळ्याचे फायदे आहेत तसे तोटेही मोठ्याप्रमाणावर आहेत बरं का...

केळ्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील. जे जीमला जातात त्यांच्यासाठी केळं म्हणजे वरदान आहे. सर्वच वयोगटातील लोकांना केळी आवडतात. केळ्याचे फायदेही खूप आहेत. जसेकी, केळ्यामुळे फारच कमी कालावधीत उर्जा मिळते. केळ्यात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे केळ्यात रोगप्रतिकारक शक्तीही असते. तसेच यामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी ६ आणि कॉपर यासारखे गुणधर्म असतात. तसेच केळयात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे तुम्ही बऱ्याच रोगांपासून दूर राहता. केळं शक्तीवर्धक तर असतेच त्याचबरोबर केळ्यात रक्तातील शर्करा प्रमाणात ठेवण्याचाही गुणधर्म आहे.

हे सर्व केळ्याचे फायदे असले तरी केळ्याचे तोटेही आहेत. कोणते? वाचा खाली

मायग्रेन होण्याची शक्यताकेळ्यात टायरामाईन नामक तत्व असते. ज्यामुळे तुम्हाला मायग्रेन होण्याची शक्यता असते. केवळ नुसतं केळचं नाही तर केळ्याचे इतरही पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ले तरीही तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते.

वजन वाढणेकेळ्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. ज्यांचे वजन कमी असते अशा व्यक्ती वजन वाढवण्यासाठी केळं खातात. मध्यम आकाराच्या केळ्यात १०५ ते ११० इतक्या कॅलरीज असतात. त्यामुळे तुम्ही केळ्याचे अतिसेवन करत असाल तर केळं तुमच्यासाठी वजन वाढण्याचं एक कारणं ठरू शकतं. त्यामुळे दिवसातून १ ते २ केळी खा.

हाइपरकलेमियाचा त्रास होण्याची शक्यताकेळ्यामध्ये पोटॅशिअम फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हायपरकलेमिया होण्याचा धोका असतो. रिसर्चने सिद्ध केलं आहे की तुमच्या शरीरात जर १८ ग्रॅंमपेक्षा जास्त केळे असले तर तुम्हाला हायपरकलेमियाची समस्या जाणवू शकते. केळं जास्त खाल्ल्यास शरीरातील पोटॅशिअम वाढल्याने हृदयाचे ठोके वाढणे, पल्स रेट वाढणे इत्यादी त्रास जाणवू शकतात.

जास्त झोप येणेकेळ्याचे जास्त सेवन केल्याने झोपेचे प्रमाण वाढू शकते. केळ्यामुळे मेंदुला आराम मिळतो. तुमचं शरीर शांत होतं. त्यामुळे तुम्हाला सतत झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही काम करताना केळ खाणं टाळा. 

त्यातल्या त्यात डाग असलेली केळी अधिक फायदेशीर असतातअ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतोजर तुम्ही डागाळलेली केळी खाल्ली तर अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अॅसिडीटी झाल्यावर करपट ढेकर येतात. त्यामुळे अॅसिडीटीपासून सुटका हवी असेल तर डाग असलेलं केळं जरुर खा.

ताण तणाव कमी होतोडाग असलेल्या केळ्यांमध्ये ताणतणाव कमी करण्याचे गुण असतात. त्यामुळे तुमचा मुड चांगला राहतो आणि मानसिक ताणतणावही कमी होतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfruitsफळे