मुंबई : घशाचा संसर्ग अर्थात थ्रोट इन्फेक्शन ही एक आरोग्य समस्या आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर या आजाराचा सामना करावा लागू शकतो. घशाचा संसर्ग होण्याची वेगवेगळी कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे वातावरण बदल. त्यासाठी अनेकदा सुरुवातीच्या काळात काही वेळ घरगुती उपाय केले जातात. त्यात गरम पाण्याच्या गुळण्या करणे हा उपाय केला जातो.
काय काळजी घ्याल? थंड खाद्य आणि पेयपासून दूर राहावे. दोन-तीन दिवसांत खोकला बरे न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या ठिकाणी धूळ प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावावा.
घशाचा संसर्ग ही सर्वसामान्य समस्या असली तरी त्यावर वेळेतच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. काही वेळा घशाच्या संसर्गामुळे ताप येतो. अशा रुग्णांना उपचारासाठी ॲण्टिबायोटिक्स द्यावे लागतात. हे आजार कमी तीव्रतेचे असतील तर एक-दोन दिवसांत घरगुती उपचाराने बरेसुद्धा होतात. - डॉ. श्रीनिवास चव्हाण, कान-नाक-घसा विभाग प्रमुख, जेजे रुग्णालय.उन्हाळ्यात शिळं अन्न, दूध अन् फळं खात असाल तर दवाखान्यातच पोहचाल! पाहा काय खाणं टाळावंच.
रोज सरासरी ३० रुग्ण सरकारी रुग्णालयांतील कान-नाक-घसा या विभागाच्या ओपीडीमध्ये हे रुग्ण उपचारासाठी येतात. जे जे रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये या संसर्गाच्या ३० रुग्णांची नोंद केली जाते.
कारणे काय? रोगप्रतिकारशक्ती चांगली नसल्यास घशाचा संसर्ग लवकर होतो. तसेच बुरशीमुळेसुद्धा या आजारात भर पडते. घशात एलर्जी झाल्यामुळेसुद्धा बहुतांश वेळा शिंका येणे, नाकातून पाणी येणे, डोळ्यांना खाज येण्यासारखी लक्षणे दिसतात. सिगारेटचा धूर, प्रदूषण आणि रासायनिक धूर यामुळे घशात जळजळ होऊन संसर्ग होत असतो.