शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता ठरू शकते गंभीर आजारांचं कारण, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:57 IST

बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात सुद्धा मुलांना आजारांना सामोरं जावं लागू शकतं. 

टेस्टोस्टोरॉन पुरुषांच्या शरीरातील एक महत्वाचा हार्मेन आहे. टेस्टोस्टोरॉनमुळे पुरुषांमध्ये लैंगिक क्षमता वाढते. पण या हार्मोनचा शरीरातील स्तर कमी झाल्यामुळे डायबिटीस, हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, थकवा येणं सांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसजसं वय वाढतं जातं तसतसं टेस्टोस्टोरॉनचा शरीरातील स्तर कमी होत जातो. सध्याच्या अनियमीत खाण्यापिण्याच्या वेळा, बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात सुद्धा मुलांना आजारांना सामोरं जावं लागू शकतं. 

टेस्टोस्टेरॉन पुरुषांमधील एड्रेनल ग्लँडमार्फत तयार होत असतो. टेस्टोस्टोरॉन हार्मोन्सचा स्तर पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी असतो. टेस्टोस्टेरॉनचा स्तर यौनक्रिया, मासपेशी आणि केसांची वाढ यांच्याशी संबंधीत असतो. पुरूषांमध्ये ४० वयानंतर या हार्मोनचा स्तर कमी  होण्यास सुरूवात होते. शरीरात टेस्टोस्टोरॉनच्या कमतरतेमुळे अशी लक्षणं दिसतात. 

टेस्टोस्टोरॉनच्या कमतरतेमुळे मासपेशी आणि हाडं कमजोर होता. त्यामुळे हाडांमध्ये तीव्र वेदना होण्याची शक्यता असते.या हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला लवकर थकवा येण्याची अशक्तपणा येण्याची शक्यता असते. याशिवाय ताण- तणाव वाढतो. सतत चिडचिड होते.  टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे लैगिंक क्षमता कमी होऊन लैगिंक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते.  अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारची नशा केल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोनमध्ये कमतरता येते. काही शोधातून असे समोर आले आहे की, नशा करणाऱ्या पुरुषांचं शरीर केवळ ५० टक्केच टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करतं. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी व्यवस्थित ठेवू शकता. 

संतुलित आहार घ्या. यासाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये अंडी, हिरव्या भाज्या आणि शेंगदाणे खाऊ शकता. कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांमुळे टेस्टोस्टेरॉनचा स्तर कमी होतो.त्यांनी आहारात झिंक आणि मॅग्नेशिअमसारखे खनिज मिळतील अशा पदार्थांचा समावेश करावा. ( हे पण वाचा-रोजच्या डासांनी हैराण असाल, तर 'या' उपायांनी त्वचेचं होणारं नुकसान टाळा)

नियमित व्यायाम करावा. व्यायाम केल्याने संपूर्ण शरीराची लवचीकता वाढते. तसंच दीर्घकाळपर्यंत तुम्ही तरूण दिसू शकता. कारण व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ   निघून जातात. तसंच  गोड पदार्थ कमी खावे. कारण याने शरीरात शुगरचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच शरीरात इन्सुलिनचं प्रमाणही वाढतं. जेव्हा गोड काही खाल्लं जातं. तेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण आपोआप कमी होतं. त्यामुळे गोड पदार्थ कमी खावे. ( हे पण वाचा-CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी १० मिनिटं ऊन अंगावर घेणं गरजेचं, तज्ञांचा दावा)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य