शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जास्त उंची असलेल्या पुरूषांसाठी चिंता वाढवणारी बातमी, उंची जास्त असेल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:19 IST

Testicular Cancer Symptoms : अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या रिसर्चमधून असं समोर आलं की, कमी उंची असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त उंची असलेल्या लोकांना एका गंभीर आजाराचा जास्त धोका असतो. 

Health : चांगल्या पर्सनॅलिटीसाठी उंची फारच महत्वाची मानली जाते. उंचीमुळे व्यक्ती रूबाबदारही दिसतो. पण एक नवा रिसर्च समोर आला असून तो वाचून जास्त उंची असलेल्या लोकांना धक्का बसू शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या रिसर्चमधून असं समोर आलं की, कमी उंची असलेल्या लोकांच्या तुलनेत जास्त उंची असलेल्या लोकांना एका गंभीर आजाराचा जास्त धोका असतो. 

या खतरनाक आजाराचं नाव आहे टेस्टिकुलर कॅन्सर. टेस्टिकुलर कॅन्सर पुरूषांच्या टेस्टिकुलर म्हणजे  अंडकोषात होणारा कॅन्सर आहे. टेस्टिकल्स पुरूषांच्या लिंगाच्या खाली असतात. यांचं काम रिप्रॉडक्शनसाठी सेक्स हार्मोन्स आणि स्पर्मचं प्रॉडक्शन करणं. इतर कॅन्सरची तुलना केली तर टेस्टिकुलर कॅन्सर होण्याचा धोका सामान्यपणे कमी असतो.  हेल्थ एक्सपर्टनुसार, टेस्टिकुलर कॅन्सर झाल्यावर टेस्टिकल्समध्ये असामान्य कोशिका वाढू लागतात. हा कॅन्सर सामान्यपणे १५ ते ४९ वर्षाच्या पुरूषांना होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.

यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचे एक्सपर्टनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत टेस्टिकुलर कॅन्सर तरूण पुरूषांना जास्त प्रभावित करतो. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, इतर देशांच्या पुरूषांच्या तुलनेत व्हाइट पुरूषांमध्ये म्हणजे गोऱ्या पुरूषांमध्ये टेस्टिकुलर कॅन्सरचा धोका सर्वात जास्त असतो. पण या गोष्टी ठोस पुरावे मिळाले नाहीत.

काय सांगतात एक्सपर्ट?

काही हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, उंच पुरूषांमध्ये टेस्टिकुलर कॅन्सर होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, काही रिसर्चमध्ये असंही समोर आलं आहे की, उंच हाइट असलेल्या पुरूषांमध्ये टेस्टिकुलर कॅन्सरचा धोका सर्वात जास्त असतो. 

यूकेच्या कॅन्सर रिसर्चचं म्हणणं आहे की, याचे अनेक पुरावे आहेत की, ज्या पुरूषांची उंची नॉर्मलपेक्षा जास्त असते. त्यांच्यात कमी उंचीच्या पुरूषांच्या तुलनेत टेस्टिकुलर कॅन्सरचा धोका फार जास्त असतो.

हेल्थ एक्सपर्टनुसार, टेस्टिकुलर कॅन्सरसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी जबाबदार असतात. जसे की तुम्ही स्मोक करता की नाही. तुमची लाइफस्टाईल आणि फॅमिली हिस्ट्री.

सुरूवातीची लक्षणे

- कोणत्याही एक टेस्टिकलमध्ये गाठ येणे किंवा साइजमध्ये फरक येणे

- टेस्टिकल्समध्ये जडपणा वाटणे

- पोट किंवा कंबरेजवळ हलकी वेदना

- टेस्टिकलमध्ये फ्लूड जमा होणे

- टेस्टिकलमध्ये वेदना 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcancerकर्करोग