'या' समस्या सतत उद्भवत असतील तर सावध व्हा; पोटाच्या कॅन्सरची असू शकतात लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 13:22 IST2019-09-15T13:17:48+5:302019-09-15T13:22:18+5:30
पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही.

'या' समस्या सतत उद्भवत असतील तर सावध व्हा; पोटाच्या कॅन्सरची असू शकतात लक्षणं
पोटाच्या कॅन्सरची सुरुवात सामान्यपणे पोटातील म्यूकस प्रोड्यूस करण्यासाठी सेल्सपासून सुरुवात होते. तसं पाहायला गेलं तर पोटाचा कॅन्सर इतर कॅन्सरच्या तुलनेमध्ये फारसा कॉमन नाही. परंतु, सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याची लक्षणं चटकन लक्षात येत नाहीत. जेव्हा लक्षात येतात तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते.
का होतो पोटाचा कॅन्सर?
सामान्यपणे कॅन्सरची सुरुवात डीएनएमधील पेशींमध्ये म्यूटेशन तयार होतात तेव्हा होते. या म्यूटेशनमुळे पेशी अनियंत्रित होतात आणि वाढतात. या पेशी एवढ्या वाढतात की, त्यामुळे नॉर्मल पेशी मृत पावतात. या पेशी एकत्र येऊन ट्यूमर तयार होतो. जो शरीराच्या दुसऱ्या भागांपर्यंत जाऊन पोहोचतो.
पोटाच्या कॅन्सरची सामान्य लक्षणं :
1. सतत उलट्या होणं आणि अस्वस्थ वाटणं
2. सतत छातीमध्ये जळजळ होणं
3. भूक कमी लागणं किंवा अचानक वजन कमी होणं
4. सतत पोट फुगणं
5. थोडसं खाल्यानंतर पोट भरणं
6. विष्ठेवाटे रक्त येणं
7. कावीळ होणं
8. सतत थकवा येणं
9. पोटामध्ये वेदना होणं किंवा काही खाल्यानंतर वेदना वाढणं
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रत्येकवेळी असं गरजेचं नाही की, ही लक्षणं पोटाच्या कॅन्सरमुळेच होतील. अनेकदा ही लक्षणं साधारण समस्यांवरून होऊ शकतात. पण जर ही लक्षणं वाढली तर मात्र त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
पोटाचा कॅन्सर होणाची कारणं :
पोटाचा कॅन्सर होण्यामागे अनेक वेगवेगळी लक्षणं असू शकतात. यामध्ये अयोग्य आहार म्हणजेच, जास्त प्रमाणात लोणचं खाणं, रोस्टेड मीट यांसारखे पदार्थ खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. तसेच पोटाचा कॅन्सर होण्यासाठीही अनेकदा जेनेटिक्सही मोठं कारण ठरतं. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला पोटाचा कॅन्सर झाला असेल तर तुम्हालाही या आजारा होण्याचा धोका वाढतो. तसेच महिलांपेक्षा पुरूषांमध्ये पोटाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतो.)