शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढताच होतात 'हे' गंभीर आजार, वेळीच जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 17:08 IST

कोलेस्ट्रॉलची पातळी धोकादायकरित्या वाढत असल्यास पायांवर त्याची काही लक्षणं दिसून येतात.

धकाधकीच्या जीवनात स्वत:ला निरोगी ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन गोष्टींच्या माध्यमातून शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता आपण करू शकतो. पण याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे हृदयरोग (Heart Disease), डायबेटिस (Diabetes), पक्षाघात (Stroke) अशा आजारांना निमंत्रण देण्यासारखं आहे. शरीराला कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) खूप गरज असते; पण रक्तातील याची पातळी वाढली तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कोलेस्ट्रॉलची पातळी धोकादायकरित्या वाढत असल्यास पायांवर त्याची काही लक्षणं दिसून येतात. आज तकने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तात असतं. रक्तातली कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) कोलेस्ट्रॉल साठून रहायला सुरुवात होते. परिणामी, हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा कमी व्हायला लागतो आणि यामुळे हृदयरोग व पक्षाघात आदी आजारांचा धोका वाढत जातो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचे काहीवेळा संकेत मिळतात तर काही वेळा ते मिळतही नाहीत.

एका अभ्यासानुसार, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर काही वेळा पायांवर त्याची लक्षणं दिसून दिसतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर पेरीफेरल आर्टरी डिसीज (Peripheral arterial disease) या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

या आजारात रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते आणि त्या संकुचित होतात. परिणामी हात आणि पायांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होतो. पायांपर्यंत योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा होत नसल्याने एखाद्या व्यक्तीला चालताना खूप वेदना होतात. पायांचा रंग बदलणं हे पेरीफेरल आर्टरी डिसीजचं मुख्य लक्षण आहे. पायांचा रंग हळूहळू निळा पडत असेल तर पायामध्ये रक्त साठत असतं. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. यामुळे शरीरात सतत वेदना होण्याची समस्या उद्भवते. प्रचंड अशक्तपणा, हातपाय सुजणं, अवयवांच्या रंगांत बदल होणं अशी लक्षणं दिसतात. या समस्येपासून सुटका करण्यासाठी शरीरातील कॉलेस्टेरॉलच्या पातळीवर नियंत्रण आणणं अत्यंत आवश्यक असतं.

कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार, एक चांगला तर दुसरा घातककोलेस्ट्रॉल हा आपल्या रक्तातील एक प्रकारचा मेणासारखा (Wax) घटक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉलचे हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन (High Density Lipoprotein) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटिन (Low Density Lipoprotein) हे दोन प्रकार असतात. यात एचडीएलला चांगलं कोलेस्ट्रॉल मानलं जातं. याची शरीरालाही खूप गरज असते. तर एलडीएलची वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून ओळख आहे. यामुळे हृदयरोग आणि पक्षाघात आदी समस्यांचा धोका वाढत असतो.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेलं अन्न न खाणं टाळावं. कारण यात चरबीचं (Fats) प्रमाण जास्त असतं. त्यामुळे आहारात फळ, भाज्या, काजू, बदाम यांचा समावेश केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. रेड मीटचं सेवन न करता चिकन खाणंही चांगलं आहे.

ताणतणाव आणि संतुलित आहार नसल्याने हाय कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवू शकते; पण आहार, जीवनशैलीवर लक्ष केंद्रीत करून व्यायामात सातत्य ठेवल्यास यावर मातही करता येऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स