३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात 'ही' ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:02 IST2024-12-21T12:01:59+5:302024-12-21T12:02:26+5:30
Symptoms of diabetes : डायबिटीस या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. ज्यासाठी रूग्णाला खूप काळजी घ्यावी लागते.

३० वयानंतर डायबिटीस झाल्यावर दिसतात 'ही' ३ लक्षणं, डोळ्यांपासून होते सुरूवात!
Diabetes symptoms in 30s: डायबिटीस हा आजार देशात वेगाने वाढत आहे. हा एक लाइफस्टाईल संबंधित आजार असून देशात रूग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. डायबिटीस आजाराला सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण हा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी रूग्णांना आयुष्यभर मेहनत करावी लागते. डायबिटीस रूग्णांना शरीराला हळूहळू आजारी करतो आणि कमजोर करतो.
धक्कादायक बाब म्हणजे डायबिटीसच्या रूग्णांमध्ये किडनी खराब होणे, डोळ्यांसंबंधी समस्या होणे आणि हृदयरोगांचा धोका होणे अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. तसेच पायांच्या नसांमध्ये वेदना, त्वचेसंबंधी समस्यांसाठीही डायबिटीस कारणीभूत असतो.
डायबिटीस या आजारावर कोणताही ठोस उपाय नाहीये. हा आजार केवळ नियंत्रित ठेवला जाऊ शकतो. ज्यासाठी रूग्णाला खूप काळजी घ्यावी लागते. अशात २५ ते ३० वयात हा आजार झाल्यावर कोणत्या समस्या होतात किंवा त्याची काय लक्षणे हे दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला वेळीच योग्य ते उपचार घेता येतील.
३० वयात डायबिटीसची लक्षणं
डोळ्यांची समस्या
हाय ब्लड शुगर लेव्हल किंवा डायबिटीस झाल्यावर डोळ्यांचं नुकसान होतं. शुगरच्या आजारात शरीरातील नसा डॅमेज होतात आणि कमजोर होतात. या कारणाने नसांमधील ब्लड सप्लाय स्लो होतो. डोळ्यांमध्येही ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित न झाल्याने रेटिनावर प्रभाव पडतो. यामुळे डायबिटीस रेटिननोपॅथीचा धोका वाढतो. त्याशिवाय रेटिनाचा मुख्य भाग मॅक्यूलामध्येही सूज वाढते. ज्यामुळे डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. धुसर दिसणे, बारीक अक्षर वाचण्यात अडचण, डोळ्यांमध्ये डाग, डोळ्यात चिरटपणा इत्यादी समस्या होतात.
पुन्हा पुन्हा तहान लागणं
कोणत्याही वयात डायबिटीस झाल्यावर सगळ्यात आधी जे लक्षण दिसतं ते म्हणजे पुन्हा पुन्हा तहान लागणं. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही आणि सतत पाणी पिण्याची ईच्छा होते. अनेकदा खूप जास्त पाणी प्यायल्यानं पोटदुखी आणि पोटात जडपणा जाणवतो.
पुन्हा पुन्हा लघवी लागणं
डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं याचीही समावेश आहे. खूप जास्त पाणी प्यायल्याने शरीरात लघवीचं निर्माण अधिक प्रमाणात होतं. याच कारणाने डायबिटीसच्या रूग्णांना पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. तसेच लघवीचा रंगही गर्द होण्यासारखं लक्षणं डायबिटीसच्या रूग्णांमध्ये दिसतं.