स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:10+5:302015-02-16T23:55:10+5:30
स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!

स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!
स वाईन फ्लू रुग्णांचा जीव धोक्यात!- ३६ नमुने प्रलंबित : तीन दिवसानंतर मिळत आहे नमुन्याचा अहवाल (स्वाईन फ्लूचा लोगो वापरावा)-लोकमत स्पेशलसुमेध वाघमारे नागपूर : राज्यात नागपुरात सर्वात जास्त स्वाईन फ्लूचे रु ग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. अपुऱ्या सोयींमुळे स्वाईन फ्लूचा धोकाही वाढत चालला आहे. परंतु प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र आहे. दिवसभरात संशयित स्वाईन फ्लूचे १५च्यावर नमुने गोळा होत असताना शासकीय प्रयोगशाळेत फक्त १३च नमुने तपासले जात आहे. यातच खासगीमध्ये नमुने तपासणीचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. सध्याच्या घडीला ३६वर नमुने प्रलंबित आहेत. परिणामी, नमुन्यांचा अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने उपचाराची दिशा ठरविण्यास डॉक्टरांना कठीण झाले असून रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. पूर्वी या आजाराच्या संशयित रुग्णाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी जात होते. परंतु दोन ते पाच दिवसानंतर स्वाईन फ्लूबाधितांचा अहवाल प्राप्त होत होता. यावर उपाय म्हणून २०१२ मध्ये नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे नमुने तपासण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. परंतु गेल्या दोन वर्षांत या आजाराच्या रुग्णांची संख्या रोडावल्याने कमी नमुने तपासणीच्या या समस्येकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. - मेयोच्या प्रयोगशाळेत रोज येतात १५ ते २० नमुने मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत रोज तपासणीसाठी संशयित स्वाईन फ्लू रुग्णाचे १५ ते २० नमुने येतात. परंतु येथील पॉलिमर चेन रिॲक्शन (पीसीआर) मशीनची मर्यादा व नमुने तपासणीसाठी लागणारा सहा तासांचा वेळ यामुळे १३वर नमुने तपासले जात नाही. यासंदर्भात अधिक माहिती देताना मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. एस.एन. श्रीखंडे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी १३वर नमुने तपासणीचा प्रयत्न केला, परंतु मशीन गरम झाल्याने हा प्रयत्न थांबविला.