डोळ्यांना ४०० टक्के व्हिटॅमिन देतात रताळे, पण अनेकांना माहीत नाही खाण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:09 IST2025-01-10T12:08:33+5:302025-01-10T12:09:07+5:30

Sweet Potato Benefits : ब्लू झोनमध्ये खाणं-पिणं आणि डाएट पूर्णपणे वेगळी असते. एक्सपर्ट यालाच जास्त वयाचं सीक्रेट मानतात. ब्लू झोनमधील लोक रताळे खूप खातात.

Sweet potatoes provide 400 percent of the vitamin for the eyes, know the right way to eat | डोळ्यांना ४०० टक्के व्हिटॅमिन देतात रताळे, पण अनेकांना माहीत नाही खाण्याची योग्य पद्धत!

डोळ्यांना ४०० टक्के व्हिटॅमिन देतात रताळे, पण अनेकांना माहीत नाही खाण्याची योग्य पद्धत!

Sweet Potato Benefits : तुम्ही अनेकदा वाचलं असेल की, ब्लू झोनमधील लोक जास्त आयुष्य जगतात. जपानच्या ओकिनावामध्ये लोकांचं संभावित वय अधिक असतं. येथील लोक १०० वयाचे झाले तरी कधीही त्यांना कोणता गंभीर आजार होत नाही. ब्लू झोनमध्ये खाणं-पिणं आणि डाएट पूर्णपणे वेगळी असते. एक्सपर्ट यालाच जास्त वयाचं सीक्रेट मानतात. ब्लू झोनमधील लोक रताळे खूप खातात. ज्यामुळे डोळे खराब होत नाहीत.

ब्लू झोनमधील जीवनावर लिहिणारे लेखक Dan Buettner यांनी सांगितलं की, ओकिनावातील लोकांच्या डाएटमध्ये ७० टक्के कॅलरी रताळ्यांमधून मिळते. हे कंदमूळ डोळ्यांसाठी खूप जास्त फायदेशीर असतं आणि यातून डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन्स ४०० टक्के जास्त असतात.

रताळे कसे खावेत?

रताळे खाल्ल्यानं डोळ्यांसोबतच त्वचाही हेल्दी राहते. यानं पोटाचं डायजेशन योग्य राहतं. पण हे फायदे मिळवण्यासाठी रताळे खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. एक्सपर्ट सांगतात की, रताळे भाजून खाणं जास्त फायदेशीर ठरतं.

४०० टक्के व्हिटॅमिन देतात भाजलेले रताळे

ब्लू झोन एक्सपर्ट सांगतात की, एक मोठं रताळं खाल्ल्यानं दिवसभरासाठी आवश्यक व्हिटॅमिन ए मिळतं. डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी याची गरज असते. एक भाजलेलं रताळं डोळे आणि त्वचेसाठी आवश्यक व्हिटॅमिन ४०० टक्के देतं.

मेंदुचं कामही सुधारेल

पोषणाच्या कमतरतेमुळे मेंदुचं कार्य व्यवस्थित होत नाही. गोष्टी लक्षात ठेवण्यास अनेकांना समस्या होते. रताळ्यामध्ये एंथेसायनिन असतं, ज्यात भरपूर शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे मेंदुला नुकसान पोहोचवणाऱ्या तत्वांपासून बचाव करतं.

गंभीर आजारांपासून बचाव

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. उपचार केल्यावरही काही लोकांचा जीव जातो. रताळे खाल्ल्यानं कॅन्सरपासून बचाव करणारे तत्व मिळतात. शरीरातील सेल्स हेल्दी बनतात आणि आरोग्य चांगलं राहतं.

पोटासंबंधी आजारापासून बचाव

रताळे पोटासाठी खूप फायदेशीर असतात. यांमध्ये सॉल्यूबल आणि इनसॉल्यूबल फायबर असतं. जे पचन तंत्र मजबूत करतात. तसेच यानं शरीरात हेल्दी बॅक्टेरिया वाढतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासही यानं मदत मिळते.

Web Title: Sweet potatoes provide 400 percent of the vitamin for the eyes, know the right way to eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.