स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:48 IST2025-01-03T09:47:40+5:302025-01-03T09:48:15+5:30

सध्या कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात असतील. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून हे संशोधन करण्यात आले आहे. 

Surgery is no longer needed for breast cancer, the panacea of 'hydrogel' has come to light | स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय

स्तनांच्या कॅन्सरसाठी आता ऑपरेशनची गरज नाही, समोर आला ‘हायड्रोजेल’चा रामबाण उपाय

नवी दिल्ली : आयआयटी गुवाहटीतील संशोधकांनी स्तनांच्या कॅन्सरवर गुणकारी ठरणारे हायड्रोजेल विकसित केले असून, ते इंजेक्शनच्या माध्यमातून देता येऊ शकेल. विशेष म्हणजे या उपचाराचे दुष्परिणामही अत्यंत कमी असतील. या संशोधनामुळे आगामी काळात कॅन्सरग्रस्त अशा रुग्णांना किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेची गरज राहणार नाही.

सध्या कॅन्सरवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचारांच्या तुलनेत या संशोधित पद्धतीमुळे रुग्णांवर होणारे दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात असतील. कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातून हे संशोधन करण्यात आले आहे. 

उपचारपद्धतीचे 
असे आहे वैशिष्ट्य
- या हायड्रोजेलच्या उपचारांमध्ये ज्या ठिकाणी गाठ आहे, त्या अचूक ठिकाणी औषधे थेट पोहोचू शकतील.
- त्यामुळे कॅन्सरग्रस्त पेशींचा इलाज होऊ शकेल. यात निरोगी पेशींना अपाय होणार नाही.

एक थ्री-डी नेटवर्क
हे हायड्रोजेल पाण्यावर आधारित एक थ्री-डी नेटवर्क असून, द्रवपदार्थ शोषून तो राखून ठेवण्यात ते सक्षम आहे.
याची रचना जिवंत पेशींची हुबेहूब नक्कल करते. जैविक वैद्यकीय उपचारांत या पेशी उपयुक्त ठरतात.

हा शोधप्रबंध रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या ‘मटेरिअल्स होरायझन्स‘मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

किमोथेरपीपासून मिळेल दिलासा
- आयआयटी गुवाहटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर देवप्रतिम दास यांच्यानुसार, सध्या जगभर कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असून, यावर किमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेसारख्या पद्धतींच्या उपचारांवरही खूपच मर्यादा आहेत.
- अनेकदा कॅन्सरची गाठ शस्त्रक्रियेनंतरही काढता येत नाही. शिवाय, केमोथेरपीमध्ये कॅन्सरग्रस्त पेशींसह चांगल्या पेशींचाही नाश होत असल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
- या नव्या तंत्रामुळे कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळू शकेल. उपचार सुसह्य ठरतील. 
 

Web Title: Surgery is no longer needed for breast cancer, the panacea of 'hydrogel' has come to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.