डोळ्यांसाठी रामबाण उपाय आहेत हे सुपरफूड्स, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:01 IST2024-04-24T12:57:39+5:302024-04-24T13:01:57+5:30
Super Food For Healthy Eye Sight: आपण जर काही फूड्सचा आपल्या आहारात समावेश केला तर डोळ्यांसाठी रामबाण उपाय ठरू शकतात.

डोळ्यांसाठी रामबाण उपाय आहेत हे सुपरफूड्स, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ!
Super Food For Healthy Eye Sight: आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, डोळे आपल्या शरीरातील सगळ्यात नाजूक अवयव आहेत. पण जास्तीत जास्त तणाव आपण यावरच देतो. दिवसभर डोळे मोबाइल बघणे, कॉम्प्युटर बघणे, लॅपटॉप बघणे तसेच धूळ आणि मातीमुळे डोळ्यांवर वाईट प्रभाव पडतो. अशात कमी वयातच डोळे कमजोर होऊ लागतात आणि यांच्या दृष्टीवरही परिणाम होऊ लागतो. अशात आपण जर काही फूड्सचा आपल्या आहारात समावेश केला तर डोळ्यांसाठी रामबाण उपाय ठरू शकतात.
गाजर
गाजर beta-carotene तत्व भरपूर असतं. जे एक व्हिटॅमिन ए चं मोठं स्रोत आहे. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या दृष्टीसाठी आणि रातआंधळेपणासाठी फायदेशीर आहे. गाजराशिवाय केशरी रंगाच्या भाज्या जसे की, रताळे आणि भोपळ्यामध्ये भरपूर beta-carotene असतं.
पालक
पालक भाजीमध्ये ल्यूटिन आणि जेक्सॅथिन तत्व भरपूर असतात. हे दोन अॅंटी-ऑक्सिडेंट डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास, मोतीबिंदूचा धोका कमी करण्यासाठी ओळखले जातात. इतकंच नाही तर हे अॅंटी-ऑक्सिडेंट रेडिनाला नुकसानकारक ब्लू रे पासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.
मासे
साल्मन, ट्यूना आणि मॅकेरलसारख्या मास्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. हे हेल्दी फॅट रेडिनाला योग्यपणे काम करण्यास मदत करतं. सोबतच डोळ्यांचा कोरडेपणा आणि मोतीबिंदूच्या लक्षणांना कमी करतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर मास्यांऐवजी अळशीच्या बीया किंवा चिया सीड्सचं सेवन करू शकता.
आंबट फळं
संत्री, लिंबू आणि द्राक्ष्यांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे डोळ्यांच्या ब्लड सेल्स हेल्दी ठेवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी मुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. तसेच याने डोळ्यांना होणारे इन्फेक्शनही कमी होतात.
ड्राय फ्रूट्स आणि सीड्स
बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बीया आणि अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं. व्हिटॅमिन ई डोळ्यांना फ्री रॅडिकल्सपासून वाचवतं.