सन फार्माच्या ‘हार्ट के लिए 8 – मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ या नव्या जाहिरातीतून भारतीयांना दैनंदिन कृतीतून त्यांच्या हृदयाचे आरोग्य जपण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 18:06 IST2026-03-18T18:04:31+5:302026-03-18T18:06:47+5:30

सन फार्मा ही जगातील आघाडीची स्पेशालिटी जेनेरिक्स कंपनी आहे. नाविन्यपूर्ण औषधे, जेनेरिक्स आणि ग्राहकोपयोगी आरोग्य उत्पादने या क्षेत्रात ही कंपनी काम करते. ही भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आणि यूएस आणि जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील आघाडीची जेनेरिक कंपनी आहे

Sun Pharma's new ad 'Heart Ke Liye 8 - Making India Heart Strong' urges Indians to take care of their heart health through daily actions | सन फार्माच्या ‘हार्ट के लिए 8 – मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ या नव्या जाहिरातीतून भारतीयांना दैनंदिन कृतीतून त्यांच्या हृदयाचे आरोग्य जपण्याचे आवाहन

सन फार्माच्या ‘हार्ट के लिए 8 – मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ या नव्या जाहिरातीतून भारतीयांना दैनंदिन कृतीतून त्यांच्या हृदयाचे आरोग्य जपण्याचे आवाहन

मुंबई : सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड (सन फार्मा) ने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘हार्ट के लिए 8- मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ ही नवी जाहिरात प्रसिद्ध केली. हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी साध्या दैनंदिन सवयी अंगी बाणवण्यासाठी यातून भारतीयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कार्डिओ-मेटाबोलिक थेरपीमधील भारतातील अव्वल क्रमांकाची फार्मास्युटिकल कंपनी म्हणून कार्डिओव्हस्क्यूलर म्हणजेच हृदयाच्या धमन्यांच्या आजारांच्या वाढत्या प्रमाणावर उपाय शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लिपिड-लोअरिंग थेरपीमध्ये दमदार नेतृत्व आणि अँटी-हायपरटेन्सिव्ह आणि ओरल अँटी-डायबिटीस उपचारांमधील लक्षणीय उपस्थितीसह ही कंपनी उपचारपद्धतीत महत्त्वाचा सहभाग नोंदवत आहे.

जगभरात कार्डिओव्हस्क्युलर डिसीजेस (CVD)मुळे म्हणजेच हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमधील जवळपास एक पंचमांश मृत्यू भारतात होतात. शिवाय, पाश्चिमात्य लोकसंख्येच्या तुलनेत साधारण दशकभर आधीच्या वयात भारतीयांवर या आजाराचा परिणाम होतो. ‘हार्ट के लिए 8- मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ या जाहिरातीतून एक संदेश देण्यात येत आहे. कधीतरी केलेल्या प्रयत्नांमुळे नाही तर छोट्या प्रमाणात पण सातत्यपूर्ण, दैनंदिन आयुष्याचा भाग बनणाऱ्या सवयींमुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते, हे यातून बिंबवण्यात येत आहे.

“उपचारांइतकाच प्रतिबंधही महत्त्वाचा आहे, यावर सन फार्मामध्ये आमचा विश्वास आहे. ‘हार्ट के लिए 8- मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’च्या माध्यमातून आम्हाला हृदयाच्या आरोग्याची चर्चा दैनंदिन जीवनात आणायची आहे आणि छोट्या पण सातत्यपूर्ण दैनंदिन सवयीतून मोठा परिणाम साधता येतो, हे भारतीयांना पटवून द्यायचं आहे. आरोग्यदायी, बळकट हृदय असेच काही न करता मिळत नाही. आपण ते निर्धाराने दररोज निर्माण करायचं असतं,” असं सन फार्माचे मार्केटिंग अॅण्ड सेल्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष शैलेश जोशी म्हणाले.

या जाहिरातीच्या केंद्रस्थानी एक बळकट हृदयाची, सकारात्मक आणि प्रेक्षकांना आपलीशी वाटेल अशी व्यक्तिरेखा आहे. समतोल, सजगता आणि दैनंदिन काळजीच्या माध्यमातून उत्तम हृदयासाठी प्रयत्न करण्याचा उत्साह या माणसात दिसून येतो. या जाहिरातीत सकारात्मक, प्रेरणादायक आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन बाळगण्यात आला आहे. त्यामुळे कोणतीही भीती किंवा धोक्याच्या सूचना न दाखवता प्रेक्षकांना त्यांच्या हृदयाच्या काळजीला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते. ही जाहिरात विविध भारतीय भाषांमध्ये चित्रित करण्यात आली आहे. हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक अशा आठ महत्त्वाच्या बाबींचा या जाहिरातीत समावेश आहे:

चांगला आहार

शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणे

वजन नियंत्रणात ठेवणे

रक्तदाब, रक्तातली साखर आणि कोलेस्टेरॉलवर लक्ष ठेवणे

तंबाखू टाळणे

नियमितपणे हृदयाचे आरोग्य तपासणे

ताणतणावाचे व्यवस्थापन

चांगली झोप

सन फार्माच्या ‘मेकिंग इंडिया हार्ट स्ट्राँग’ उपक्रमातून हृदयाचे आरोग्य या विषयावर समावेशक दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. यात प्रतिबंध, आपातकालीन स्थितीतील प्रतिसाद आणि रुग्णशिक्षण यासाठी खालील बाबींचा समावेश आहे:

- वेळेत निदान यासाठी मोठ्या प्रमाणावर हृदय तपासणी कॅम्प – दरवर्षी १०,००० कॅम्प्समधून १.२ लाख लोकांची तपासणी#

- आपातकालीन स्थितीसाठी सज्जता यासाठी दरवर्षी १.५ लाखांहून अधिक लोकांना सीपीआरचे प्रशिक्षण# 

- पुरावे निर्माण करून जोखमीचे वर्गीकरण आणि रुग्णांवरील परिणामांना बळकटी देणे

- रुग्णशिक्षण क्लिनिकमधील छापील पत्रके आणि जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी १५ दशलक्षांहून#

अधिक लोकांपर्यंत पोहोच

या सर्व प्रयत्नांचा उद्देश प्रतिबंध, प्रतिसाद आणि जागरुकतेला बळकटी देण्याचा उद्देश आहे. जेणेकरून भारतातील हृदयविकारांचे गांभीर्य दीर्घकालीन स्वरुपावर कमी होऊ शकेल.

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल (CIN - L24230GJ1993PLC019050)

सन फार्मा ही जगातील आघाडीची स्पेशालिटी जेनेरिक्स कंपनी आहे. नाविन्यपूर्ण औषधे, जेनेरिक्स आणि ग्राहकोपयोगी आरोग्य उत्पादने या क्षेत्रात ही कंपनी काम करते. ही भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आणि यूएस आणि जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील आघाडीची जेनेरिक कंपनी आहे. सन फार्माच्या अत्यंत प्रगतीशील जागतिक नाविन्यपूर्ण औषधांच्या उत्पादन यादीत त्वचारोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र आणि कर्करोग-त्वचारोग यातील नाविन्यपूर्ण उत्पादने आहेत आणि या उत्पादनांचा कंपनीच्या एकूण विक्रीत २० टक्के वाटा आहे. कंपनीच्या एकात्मिक कार्यचलनातून निर्माण होणाऱ्या उच्च दर्जाच्या औषधांवर १०० हून अधिक देशांमधील फिजीशिअन्स आणि ग्राहकांचा विश्वास आहे. त्यांची उत्पादन केंद्रे पाच खंडांमध्ये विस्तारली आहेत. सन फार्माला ५० हून अधिक देशांमध्ये असलेल्या आपल्या बहूसांस्कृतिक मनुष्यबळाचा अभिमान आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.sunpharma.com इथे भेट द्या आणि आम्हाला LinkedIn आणि X वर (आधीचे ट्विटर) फॉलो करा.

Web Title : सन फार्मा का अभियान: भारतीयों को हृदय स्वास्थ्य को प्राथमिकता देने का आग्रह।

Web Summary : सन फार्मा के 'हार्ट के लिए 8' अभियान में हृदय स्वास्थ्य के लिए सरल दैनिक आदतों को प्रोत्साहित किया गया है। भारत में हृदय रोगों से निपटने के लिए रोकथाम, शुरुआती निदान, सीपीआर प्रशिक्षण और रोगी शिक्षा पर जोर दिया गया है, जिसका लक्ष्य दीर्घकालिक प्रभाव डालना है।

Web Title : Sun Pharma's campaign urges Indians to prioritize heart health daily.

Web Summary : Sun Pharma's 'Heart Ke Liye 8' campaign encourages simple daily habits for heart health. It emphasizes prevention, early diagnosis, CPR training, and patient education to combat rising cardiovascular diseases in India, aiming for long-term impact.