शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
4
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
5
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
6
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
7
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
8
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
9
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
10
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
11
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
12
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
13
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
14
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
15
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
16
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
17
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
18
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
19
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
20
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास होऊ शकतात गंभीर आजार; वेळीच या पदार्थांचे करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 12:19 IST

अमेरिकेतील नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनमध्ये याबाबत अधिक माहिती प्रकाशित करण्यात आली  आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसात  शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळेच लोकांना डिहायड्रेश किंवा युरिन इन्फेक्शनसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात पुरेसं पाणी नसतं. त्यावेळी अशा आजारांचा सामना करावा लागतो.  लहान मुलांपासून, वयस्कर लोकांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. आधीच जर तुम्ही आहारात काही पदार्थांचे सेवन केले तर या समस्यांपासून लांब राहू शकता. म्हणून आज आम्ही तुम्हाला शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे. याबाबत सांगणार आहोत. अमेरिकेतील नेशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनमध्ये याबाबत अधिक माहिती प्रकाशित करण्यात आली  आहे. 

काकडी

काकडी ही फळभाजी थंड असते म्हणून उन्हाळ्यात तिचा जास्त वापर केला जातो. काकडीत ९० टक्के पाणी असल्याने शरीराला आवश्यक पाण्याची पातळी काकडीतून गाठता येते. या आणखीही रेसिपी सहज बनवता येऊ शकतात. त्यापैकीच या पाच रेसिपी... उन्हाळ्यात नक्की ट्राय कराव्यात. 

उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. अशावेळी पाण्याऐवजी तुम्ही काकडीचा रस पिऊ शकता. काकडीचा रस करून तो फ्रिजमध्ये ठेवा व काही वेळाने थंड रस प्या. आरोग्यासाठी हा रस फायदेशीर ठरेल सोबतच शरीराला थंडावाही मिळेल.  

काकडीचा रस, लिंबाचा रस, साखर यांचं मिश्रण घेऊन थंड करून ते प्यावं. उन्हात येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षारांची संख्या कमी होते. म्हणून काकडीचा ज्यूस हा नेहमीच उपयोगाचा असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

जर तुम्हाला कोणतीही रेसिपी बनवण्याचे कष्ट नको असतील तर तुम्ही काकडी धुऊन त्याचे काप करून खाऊ शकता. या फोडींना मीठ व मिरी पावडर लावल्यास त्या चवदार-चविष्ट होतील.

कलिंगड

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा आहारात समावेश केला जातो. सगळ्यात जास्त खाल्ल जाणारं आणि लोकांचं आवडीचं असणारं कलिंगड बाजारात दिसायला सुरुवात झाली आहे.  कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात.

 समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कलिंगड नियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीत सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते. – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील हे फळ चांगले मानले जाते आणि म्हणूनच हंगामात स्ट्रॉबेरी खाणे आवश्यक आहे. 

साध्या वाटणाऱ्या 'या' ७ लक्षणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो हृदयाचा गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

तुम्ही आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश करू इच्छित आसल तर कोणतीही समस्या नाही. आपण हे संपूर्ण फळ खाऊ शकता किंवा त्याचे फ्रुट सलाड बनवून देखील खाऊ शकता. आपल्याला आवडत असल्यास, स्ट्रॉबेरी स्मूदीमध्ये टाकून किंवा त्याचा मिल्कशेक बनवून देखील पिऊ शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल