ेसारांश
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30
सुरक्षा जवानांना राखी भेट

ेसारांश
स रक्षा जवानांना राखी भेट नागपूर : २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट, धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर असणाऱ्या सुरक्षा जवानांसाठी रक्षाबंधनानिमित्त महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटस्नी लेफ्ट. सुभाष दाढे यांच्या मार्गदर्शनात राख्या जमा केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन भेलकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. चंगोले, संगीता जीवनकर, गहरवार, सुबोध तायवाडे, विशाल तालेवार, नीलेश ताकतोडे, पवन उईके, नीलेश साखरकर, रोहन बोरकुटे, नितीन मिसाळ उपस्थित होते. -------जीवन शिक्षण विद्यालयाचे सुयश नागपूर : स्पोर्टस् कुने दो कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मंदसौर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत जीवन शिक्षण विद्यालयाच्या आकाश कुंभरे, कोमल कठाणे यांनी सुवर्णपदक, दिव्या माटे ब्रान्झ, अपूर्वा माकोडे यांनी चांदीच्या पदकांची कमाई केली. आकाश कुंभरे या कराटेपटूला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेच्या संचालक मंडळाने, मुख्याध्यापिका काळबेंडे, शारीरिक शिक्षक पी.डी. चावके, मोतीकर, श्याम भोवते यांनी अभिनंदन केले आहे.-----------क्षयरोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवानागपूर : मोटघरे हनुमान मंदिरात स्वातंत्र्यदिन पंधरवड्यानिमित्त क्षयरोग जनजागृती अभियानांतर्गत क्षयरोग रॅलीचे आयोजन करण्यात आले. अक्षय प्रकल्पच्यावतीने युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, ममता हेल्थ इन्स्टट्यिूट फॉर मदर ॲण्ड चाईल्डच्या सहयोगाने स्थानिक माजी नगरसेवक जुल्फेकार अली भुट्टो यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भुट्टो यांनी क्षयरोगाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. -----महागाईच्या विरोधात माकपची निदर्शने नागपूर : कांद्याचे भाव ७० रुपये किलोच्या घरात गेले असून इतर पदार्थांचे, डाळीचे भावही गगनाला भिडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. पक्षाचे जिल्हा सचिव अमृत कोल्हे म्हणाले, मागील काही वर्षांपासून अचानक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. यासंदर्भात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. यानंतर पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.