शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 09:59 IST

दलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात.

(Image Credit : phunuonline.com.vn)

बदलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. भारतीय लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक रिसर्च समोर आला असून हा रिसर्च लॅन्सेट सायकायट्री नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चनुसार, देशातील प्रत्येकी ७ पैकी १ भारतीय गंभीर मानसिक आजाराने पीडित आहे. ही आकडेवारी २०१७ असून आता ही वाढली असण्याचीही शक्यता आहे.

किती लोक मानसिक आजारांनी पीडित?

(Image Credit : psycom.net)

हा रिसर्च ‘इंडिया स्टेट लेवल डिजीज बर्डन इनिशिएटिव्ह’ने केला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, डिप्रेशन आणि एग्जायटी म्हणजे अस्वस्थता सर्वात कॉमन मानसिक आजार आहे. आणि देशात या दोन आजारांनी पीडित लोकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. भारतात १९९० पासून ते २०१७ म्हणजे २७ वर्षाच्या आकडेवारीवर आधारित हा रिसर्च आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारताच्या १९.७ म्हणजे साधारण २० कोटी लोक मानसिक आजाराने पीडित आहेत आणि हा एकूण लोकसंख्येचा १४.३ टक्के भाग आहे. यातील ४.६ कोटी लोक डिप्रेशन आणि ४.५ कोटी लोक एग्जायटीने पीडित होते. 

काय आहे कारणे?

एम्सचे  सायकायट्रीचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य डॉ. राजेश सागर म्हणाले की, 'डिप्रेशन आणि एंग्जायटी या दोन्ही समस्यांचं कारण आहे स्ट्रेस. तेच लहान मुलांबाबत सांगायचं तर त्यांना भिती दाखवल्याने, धमकावल्याने या दोन मानसिक समस्या बघायला मिळतात. इतकेच नाही तर सामाजिक परिस्थितीत होत असलेल्या बदलांमुळेही लोकांमध्ये स्ट्रेस वाढतो. आधी संयुक्त परिवार असायचे आणि लोक आपल्या समस्या एकमेकांसोबत शेअर करून मन हलकं करायचे. पण आता हे शक्य नाही.

कुणाला जास्त डिप्रेशनची समस्या

रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मध्यम वयाचे लोक डिप्रेशनने अधिक पीडित असतात. सोबतच डिप्रेशनचा संबंध भारतात होणाऱ्या आत्महत्यामुळेही आहे. मानसिक आजारांचा आकडा १९९० ते २०१७ दरम्यान दुप्पटीने वाढला आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यResearchसंशोधन