सावधान! कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त जबाबदार आहे 'ही' गोष्ट, लोकांमध्ये वेगाने वाढतीये ही समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 11:29 IST2019-07-04T11:22:53+5:302019-07-04T11:29:26+5:30
यूके कॅन्सर रिसर्चकडून एक रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चनुसार, यूकेतील साधारण एक तृतियांश लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत.

सावधान! कॅन्सरसाठी स्मोकिंगपेक्षा जास्त जबाबदार आहे 'ही' गोष्ट, लोकांमध्ये वेगाने वाढतीये ही समस्या!
सामान्यपणे लोकांची अशी धारणा असते की, स्मोकींग, मद्यसेवन, तंबाखू यांचं सेवन केल्याने कॅन्सर होतो. पण आता नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, लठ्ठ लोकांना कॅन्सर होण्याचा धोका स्मोकींग करणाऱ्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असतो.
यूके कॅन्सर रिसर्चकडून एक रिसर्च करण्यात आला होता. या रिसर्चनुसार, यूकेतील साधारण एक तृतियांश लोक लठ्ठपणाचे शिकार आहेत. तर स्मोकिंग अजूनही कॅन्सर त्या कारणांमध्ये आहे ज्याला रोखलं जाऊ शकतं.
लठ्ठपणामुळे कॅन्सरच्या केसेस वाढल्या
यूकेमध्ये दरवर्षी स्मोकिंगच्या तुलनेत पोटाच्या कॅन्सरच्या १९०० केसेस समोर येतात. ज्याचं कारण आहे लोकांचं सतत वाढणारं वजन. लठ्ठपणाच्या वजनामुळे कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर आणि लिव्हरचा कॅन्सर होण्याच्या घटना वेगाने वाढत आहेत.
कॅन्सर आणि लठ्ठपणात कनेक्शन
शरीरातील एक्स्ट्रा फॅट मेंदूला हा संकेत पाठवतात की, त्यांना सेल्सना लवकर-लवकर आणि जास्त विभाजीत करण्याची गरज आहे. याने सेल्सचं नुकसान होतं आणि कॅन्सरचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि कॅन्सर यांच्या कनेक्शनबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याची गरज आहे.
चांगल्या सवयी गरजेच्या
या रिसर्चमध्ये तंबाखूची तुलना खाण्याशी केली गेली नाही तर धुम्रपान आणि लठ्ठपणाची केली गेली आहे. जेणेकरून लोकांना चांगल्या सवयींसाठी प्रेरित केलं जावं. या रिसर्चचे मुख्य वैज्ञानिक मिशेल यांनी सांगितले की, 'स्मोकिंग रेट भलेही खाली येत असला तरी लठ्ठपणाचा रेट वाढत आहे. ज्याचा थेट प्रभाव नॅशनल हेल्थ क्रायसिसवर बघायला मिळत आहे. आपली मुलं येणाऱ्या काळात भलेही स्मोक-फ्री वातावरणात राहतील, पण बालपणातच लठ्ठपणाची समस्या त्यांना आजारांच्या खाडीत ढकलत आहे'.
लठ्ठपणामुळे होतो १३ प्रकारचा कॅन्सर
वैज्ञानिकांनी आतापर्यंत हे सिद्ध केलं आहे की, लठ्ठपणामुळे एक किंवा दोन नाही तर तब्बल १३ प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात त्यामुळे या प्रकरणात आणखी जास्त रिसर्च करण्याची गरज आहे. हे अधिक जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, एक्स्ट्रा फॅट कॅन्सरसाठी कशाप्रकारे जबाबदार आहे.