शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुल रडायला लागल्यावर लगेच त्याला जवळ घेता का? तुमची ही सवय मुलासाठी पडू शकते महागात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 10:07 IST

काही पालकांना वाटतं की, त्यांचं बाळ रडायलाच नको. बाळ रडायला लागलं की, लगेच त्याला गप्प करू लागतात. पण लहान मुलांचं रडणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.

लहान मुलं खूप रडतात आणि मग आई-वडील बाळाचं रडणं थांबवण्यासाठी काय काय करतात हे तुम्ही पाहिलं असेलच. काही पालकांना वाटतं की, त्यांचं बाळ रडायलाच नको. बाळ रडायला लागलं की, लगेच त्याला गप्प करू लागतात. पण लहान मुलांचं रडणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. असं आम्ही नाही तर एक रिसर्च सांगतोय. एका रिसर्चनुसार, ३ महिन्यांपासून ते १८ महिन्याच्या बाळांना काही वेळ रडू द्यावं. ते रडल्यावर तुम्ही लगेच त्यांच्याजवळ जात असाल किंवा त्यांना जवळ घेत असाल तर याने त्यांच्या विकासावर प्रभाव पडू शकतो. 

(Image Credit : snopes.com)

ब्रिटनच्या वारविक युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला असून त्यात हा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यानुसार,  जन्मापासून ते दीड वयापर्यंतच्या लहान मुलांना थोडा वेळ रडू दिलं तर त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता मजबूत होते. सोबतच ते हळूहळू स्वत:वर कंट्रोल ठेवण्याची त्यांना सवयही लागते. मात्र, ते रडत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावं.

(Image Credit : momjunction.com)

लहान मुलांची रडण्याची पद्धत, व्यवहार आणि यादरम्यान आई-वडिलांची प्रतिक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी सात हजारपेक्षा जास्त लहान मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांचा अभ्यास केला. काही काही वेळाने त्यांचं मूल्यांकन केलं गेलं की, जेव्हा बाळ रडतं तेव्हा आई-वडील लगेच हस्तक्षेप करतात की त्यांना काही वेळ रडू देतात. या प्रयोगाचं मूल्यांकन दर ३, ६ आणि १८ महिन्यांमध्ये करण्यात आलं.

काय आढळून आलं?

(Image Credit : goodtoknow.co.uk)

प्रयोगात हे बघण्यात आलं की, रडण्यादरम्यान आई-वडील दूर राहण्यात आणि पुन्हा बाळाजवळ येण्याने बाळाच्या व्यवहारात किती फरक पडला. याच्या निष्कर्षातून समजलं की,  ज्या बाळाचे आई-वडील ते रडल्यावर लगेच त्याच्याजवळ येत होते, त्या बाळाचा विकास हळू झाला. तर जे आई-वडील त्यांच्या बाळाला थोडा वेळ रडण्यासाठी सोडत होते त्या बाळाची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढली होती. ते इतर बाळांच्या तुलनेत अधिक चंचल आणि सक्रिय होते.

रिसर्चदरम्यान बाळांचं संगोपन, रडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि आई-वडिलांच्या व्यवहाराचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चचे मुख्य डॉ. एयटन बिलगिन यांनी सांगितले की, आम्ही ३ ते १८ महिन्यांच्या बाळांच्या ७ हजारपेक्षा जास्त मातांचा अभ्यास केला. त्यांच्या व्यवहाराचा अभ्यास केला. त्यात दिसून आलं की, त्या किती संवेदनशील आहेत आणि बाळांवर काय परिणाम होतो.  

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स