आत्महत्येवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकं काय सुरू असतं? रिसर्चमधून खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 10:26 AM2019-12-05T10:26:16+5:302019-12-05T10:26:48+5:30

काही दिवसांपूर्वीच गाजियाबादमधील एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांसहीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सतत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनाही होत राहतात.

Study says brain play crucial role in suicide risk, know how? | आत्महत्येवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकं काय सुरू असतं? रिसर्चमधून खुलासा....

आत्महत्येवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकं काय सुरू असतं? रिसर्चमधून खुलासा....

googlenewsNext

काही दिवसांपूर्वीच गाजियाबादमधील एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांसहीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सतत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनाही होत राहतात. अशा प्रकारच्या घटना वाचून लोक सुन्न होतात. चांगले शिक्षित लोकही आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. मग लोकांना प्रश्न पडतात की, थेट आत्महत्या करून जीवन संपवण्याचा विचार या लोकांच्या मनात कसा येतो? किंवा त्यावेळी त्यावेळी त्यांचा मेंदू कशाप्रकारे काम करतो? अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून या प्रश्नांची उत्तरे समोर आली आहेत. हा रिसर्च जरी अमेरिकेत करण्यात आला असला तरी आत्महत्या भारतातही होतात. त्यामुळे या रिसर्चवरून निदान लोकांची मानसिकता समजून घेता येऊ शकते.

जगभरात किती आत्महत्या?

(Image Credit : forbes.com)

medicalxpress.com ने दिलेल्या वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून जाहीर करण्यात आलेल्या एका आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात साधारण ८ लाख लोक आत्महत्या करतात. म्हणजे दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आपलं जीवन संपवतो. यात सर्वाधिक संख्या ही १५ ते २९ वयोगटातील असते. यूएसमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये मेंदूच्या अशा नेटवर्कबाबत माहिती मिळवण्यात आली, जो आत्महत्येचा विचार वाढवण्यात मुख्य भूमिका निभावतो.

३० वर्षांपेक्षा कमी लोकांची संख्या अधिक

(Image Credit : changedirection.org)

हा रिसर्च नुकताच मोलेकुलर सायकायट्री जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात सांगण्यात आलं आहे की, जगभरात तरूणांच्या मृत्यूचं दुसरं मोठं कारण हे आत्महत्या आहे. आत्महत्येमुळे मरण पावलेल्या तरूणांची संख्या कॅन्सर, हार्ट डिजीज, एड्स, बर्थ डिजीज, स्ट्रोक, निमोनिया, इंफ्लूएंजा आणि लंग्स डिजीज सारख्या गंभीर आजारांनी मृत्यूमुखी पडणाऱ्या तरूणांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. 

तीनपैकी एक अल्पवयीन करतो प्रयत्न

(Image Credit : gulfnews.com)

या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, ज्या तीन अल्पवयीन तरूणांच्या मनात आत्महत्येचा विचार येतो, त्यातील १ आत्महत्येचा प्रयत्न करतो. या रिसर्चचे मुख्य लेखक आणि कॅम्ब्रिज विश्वविद्यालयाचे डॉ. ऐनी लौरा वॅन हरमेलन हे म्हणाले की, 'जगभरातील एक तृतियांश तरूण ३० वयाआधीच मृत्यूला कवटाळतात आणि आपल्याला त्यांच्या या अति संवेदनशील कारणांबाबत काहीच माहीत नाही. 

दोन ब्रेन नेटवर्क आहेत जबाबदार

(Image Credit : medicalnewstoday.com)

साधारण दोन दशक म्हणजे २० वर्षांपर्यंत चाललेल्या या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १२ हजारपेक्षा अधिक लोकांना सहभागी करून घेतले होते. हे सर्व लोक ते होते, ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता किंवा त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रिसर्चमधून समोर आलं आहे की, आपल्या मेंदूमधील दोन नेटवर्क असे असतात, जे अशाप्रकारच्या विचारांसाठी जबाबदार असतात आणि व्यक्तीला आत्महत्येचा विचारांनी पेटवतात. यादरम्यान या ब्रेन नेटवर्कचं स्ट्रक्चर, काम करण्याची पद्धत आणि मोलेकुलर अल्टरनेशन म्हणजे आण्विक परिवर्तनचा खोलवर अभ्यास करण्यात आला.

कसं काम करतं पहिलं नेटवर्क?

या नेटवर्कमध्ये मेंदूचे जे दोन भाग सहभगी असतात त्यातील पहिला आहे मेंदूच्या समोरील भाग. त्याला लेट्रल वेंट्रल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणून ओळखलं जातं. हा मेंदूच्या दुसऱ्या भागासोबत आपल्या इमोशनना कनेक्ट करण्यास मदत करतो. या नेटवर्कमध्ये काही बदल झाला तर मेंदूमध्ये जास्त नकारात्मक विचार येतात आणि आपल्याला इमोशन कंट्रोल करण्यास अडचण येते.

दुसरं नेटवर्क

(Image Credit : news.mit.edu)

मेंदूचा मागचा भाग आत्महत्येसाठी भाग पाडणाऱ्या दुसऱ्या नेटवर्कच्या रूपात काम करतो. याल डोर्सल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि अवर फ्रंटल गायरस प्रणालीच्या रूपात ओळखलं जातं. या नेटवर्कमध्ये बदल झाल्यास आत्महेत्याचा विचार कंट्रोल होऊ शकतो. म्हणजेच काय तर पर्यायी समाधान देणे, आपल्या विचारांना मूळ रूप देणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे यात या नेटवर्कची मुख्य भूमिका बघण्यात आली.

(Image Credit : bloomberg.com)

रिसर्चमधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या असल्या तरी अभ्यासक सांगतात की, या दिशेने त्यांना अधिक काम करण्याची गरज आहे. कारण आतापर्यंत जेवढा रिसर्च करण्यात आलाय त्यात टाइम ड्युरेशनऐवजी मेंदूच्या स्नॅशॉट्सवर काम करण्यात आलं. याचा व्यक्तीकडून करण्यात आलेल्या आत्महत्येचा विचार आणि प्रयत्नाशी संबंधित आहे. 


Web Title: Study says brain play crucial role in suicide risk, know how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.