शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

किमान साडे सात तास न झोपल्यास बळावतो 'हा' कायमस्वरुपी जीवघेणा आजार, आयुष्य येतं धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:31 IST

अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो.

निरोगी राहण्यासाठी झोप खूप (Sleeping) महत्त्वाची आहे. गरजेपेक्षा कमी झोपणे किंवा जास्त झोप घेणं हे देखील शरीरासाठी हानिकारक आहे. जे लोक साडेसात तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात हा दावा केला आहे. संशोधक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेंडन लुसी सांगतात की, अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार आणि समजण्याच्या क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर दिसून येतो.

संशोधक म्हणतात, 'जर तुम्हाला ८ तासांची झोप मिळत असेल. जर तुम्ही ३० मिनिटे आधी अलार्म लावला तर साडेसात तासांच्या झोपेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो म्हणजेच गोष्टी विसरणार नाहीत.

मेंदूमध्ये अल्झायमर कसा वाढतो?खरं तर, झोपताना आपल्या शरीरात काही सकारात्मक बदल होतात. यामध्ये आपली वाढ, सुधारणा, पेशींची विश्रांती आणि मानसिक विकास यांचा समावेश होतो. जर आपण पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला हे फायदे मिळत नाहीत. पुरेशी झोप न मिळणे हे मानसिक क्षमता आणि स्मरणशक्तीसाठी खूप धोकादायक आहे. तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते, स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो. ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही ते अनेकदा तणाव आणि मानसिक समस्यांना बळी पडतात. पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूला योग्य प्रमाणात विश्रांती मिळत नाही.

सरासरी ७५ वर्षे वय असलेल्या १०० वृद्धांवर केलेल्या संशोधनातही याची खात्री झाली आहे. संशोधनासाठी या ज्येष्ठांच्या कपाळावर एक छोटा मॉनिटर बांधण्यात आला होता. झोपेच्या वेळी मेंदूमध्ये कोणत्या प्रकारची क्रिया घडते, हे मॉनिटरद्वारे तपासले गेले. सरासरी साडेचार वर्षे चाललेल्या संशोधनात याचा मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होत असल्याचे समोर आले.

शास्त्रज्ञांच्या मते, रुग्णांमध्ये अल्झायमर रोगासाठी एक विशेष प्रकारची प्रथिने जबाबदार असतात. संशोधनात सहभागी असलेल्या वृद्धांच्या मेंदूच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये त्या प्रोटीनची पातळी काय आहे. दररोज रात्री सुमारे ७.५ तास झोपलेल्या रुग्णांचे संज्ञानात्मक गुण चांगले होते. जे लोक दिवसातून ५ किंवा साडेपाच तास झोपतात त्यांच्यात हे गुण कमी आढळले.

झोपेच्या कमतरतेचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवरही होतो. पुरेशी झोप न मिळाल्याने पचनशक्ती कमकुवत होते, त्यामुळे तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे शरीर आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळत नाही, त्यामुळे शारीरिक दुखणे, जडपणा, डोके जड होणे, चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स