शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अंतराळ प्रवासाचा मेंदूवर होतो प्रभाव - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:08 AM

जर्मनीतील म्यूनिच येथील लुडविद मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी (LMU) च्या अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला.

रशियातील काही अंतराळविरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हे समोर आलं आहे की, अंतराळात फार जास्त काळ घालवल्यानंतर त्या व्यक्तींच्या केवळ मांसपेशी आणि हाडांचच नुकसान होतं असं नाही, तर त्यांच्या मेंदूवरही याचा खोलवर परिणाम होतो. एलएमयूचे प्राध्यापक पीटर जू यूलेनबर्ग म्हणाले की, 'अशाप्रकारचं हा पहिलाच शोध आहे. ज्यात अंतराळ मिशननंतर मेंदूच्या संरचनेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे'.

जर्मनीतील म्युनिक येथील लुडविद मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी (LMU) च्या अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला. यात सहभागी अभ्यासकांनी सांगितले की, मेंदूतील वेगवेगळ्या पेशी अंतराळातील गुरुत्वाकर्षणावर कशी प्रतिक्रिया देतात, याबाबत फार स्पष्टता नाही. तसेच सामान्य गुरुत्वाकर्षणात परत आल्यावर मेंदूतील संरचनेमध्ये काही बदल होतो का किंवा नाही. जर बदल होत असेल तर हा बदल कसा असेल, हे सुद्धा स्पष्ट नाही, असे ते म्हणाले.  

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित या अभ्यासात दाखवण्यात आले आहे की, मेंदूतील तीन मुख्य ऊती(पेशी)च्या गटात येणाऱ्या बदलाची माहिती मोहिम संपल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यात मिळवता येऊ शकते. हा अभ्यास १० अंतराळ वीरांवर केला गेला. या सर्वच लोकांनी अंतराळात सरासरी १८९ दिवस घालवले होते. 

अंतराळात राहणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूवर होणाऱ्या प्रभावाची माहिती घेण्यासाठी अभ्यासकांनी मॅग्नेटिक रेजोनेन्स टोमोग्राफी (MRT) तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेंदूचे काही फोटो काढले गेले. काही फोटो अंतराळवीर अंतराळ प्रवासाला जाण्यापूर्वी आणि काही फोटा नंतर बऱ्याच कालावधीने ते परत आल्यावर घेतले गेले. त्यासोबतच ७ अंतराळवीरांच्या मेंदूची तपासणी त्यांच्या ७ महिन्यांच्या प्रवासानंतर केली गेली. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स