पावसाळा सुरू होताच या गंभीर आजारांचा असतो धोका, वेळीच लक्ष न दिल्यास पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 04:37 PM2021-06-17T16:37:22+5:302021-06-17T17:45:38+5:30

पावसाळा तुम्हाला कितीही आवडत असला तरी पावसाळ्यात होणारे गंभीर आजार हे पावसासोबत येतातच. त्यामुळे विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे.

As soon as the rainy season starts, there is a risk of these serious diseases, if not taken care of in time, it will become expensive ... | पावसाळा सुरू होताच या गंभीर आजारांचा असतो धोका, वेळीच लक्ष न दिल्यास पडेल महागात...

पावसाळा सुरू होताच या गंभीर आजारांचा असतो धोका, वेळीच लक्ष न दिल्यास पडेल महागात...

Next

पावसाळा सुरू झालाय. सृष्टी अत्यंत हिरवीगार दिसतेय. मात्र या पावसाळ्याने अनेक रोगांना आमंत्रण दिलंय. पावसाळा तुम्हाला कितीही आवडत असला तरी पावसाळ्यात होणारे गंभीर आजार हे पावसासोबत येतातच. त्यामुळे विशेषत: कोविडच्या परिस्थीतीच रोगांपासून बचाव करण्यावरच आपला भर असला पाहिजे. या पावसाळ्यातील आजाराबाबत आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामनी यांनी व्हिडिओ द्वारे या रोगांपासून बचावण्याचे उपाय सांगितले आहेत.


कशी काळजी घ्यावी?
डॉ. रेखा यांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात पंचकर्मासारखे उपचार करून किंवा संतूलित आहाराचे सेवन करून काळजी घेऊ शकता.
हलके आणि ताजे अन्न खावे
उकळलेलं पाणी किंवा हर्बल टी प्यावी
तेलकट खाऊ नये.
शिळे अन्न खाऊ नका
मधाचा वापर करा
तेला ऐवजी तुपाचा वापर करा
जेवणानंतर ताक प्या
एक वर्ष जुना तांदुळ जेवणात वापरा


पंचकर्म म्हणजे काय?
पंचकर्म म्हणजे अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात. या प्रक्रियेमुळे तुम्ही पावसाळ्यात आजारांपासून दूर राहु शकता.


शरीरातील तीन दोष संतुलित करणे आवश्यक
वात, कफ, पित्त हे दोष संतुलित करणं आर्युवेदात अत्यंत महत्वाचं मानलं गेलंय. कफ दोषामुळे २८ रोग, वात दोषामुळे ८० रोग, पित्त दोषामुळे ४० रोग होत असल्याचं आर्युवेदात नमुद करण्यात आलं आहे.


मॉडरेट एक्सरसाईज
डॉ. रेखा यांनी सांगितले आहे की, पावसाळ्यात जास्त हेवी एक्सरसाईज करू नका. या मौसमात मॉडरेट एक्सरसाईज करणंच योग्य आहे. यासाठी तुम्ही योगाही करू शकता.

Web Title: As soon as the rainy season starts, there is a risk of these serious diseases, if not taken care of in time, it will become expensive ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.