अखेर मृत्यूलाच शरण
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30
अखेर मृत्यूलाच शरण

अखेर मृत्यूलाच शरण
अ ेर मृत्यूलाच शरण मेडिकलमधील घटना : उपचाराविना रुग्णाचा तडफडत मृत्यू(मृतदेहाचा फोटो रॅपमध्ये आहे)नागपूर : तो उपचारासाठी मदत मागत होता. परंतु कुणीच समोर आले नाही, उलट त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दुपारी त्याने विभागाच्यासमोरच रक्ताची उलटी केली, परंतु सर्वांनीच दुर्लक्ष केले, अखेर तडफडतच त्याचा मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना कुठल्या चौकातील नाही तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकल रुग्णालयातील आहे. सचिन कापसे (३२) रा. यवतमाळ असे मृताचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, हा रुग्ण एचआयव्हीबाधित असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आला नसल्याची माहिती आहे. मंगळवारी शासकीय सुटी असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद होता. यामुळे सचिन दुपारी १२ वाजताच्या सुमारास आकस्मिक विभागात उपचारासाठी आला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तो एकटाच होता. त्याला मेडिकलची माहिती नव्हती. यामुळे केसपेपर न काढताच तो थेट डॉक्टरांकडे गेला, आणि तपासण्याची विनंती करू लागला. त्याला धड बोलताही येत नव्हते. डॉक्टरांनी त्याला केसपेपर काढण्यास सांगितले, परंतु ते कुठे काढल्या जातात याची माहिती दिली नाही. तो रुग्ण इतरांकडे मदतीची मागणी करीत होता. परंतु कुणीच समोर आले नाही. अखेर सुरक्षा रक्षकाने त्याला आकस्मिक विभागाच्या बाहेर काढले. विभागाच्यासमोर बराच वेळ तो बसून होता, ये-जा करणाऱ्यांना उपचारासाठी गयावया करीत होता, अचानक त्याला रक्ताची उबळ आली. परंतु त्यानंतरही त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर ५ वाजताच्यासुमारास तिथेच त्याचा तडफडत मृत्यू झाला. परंतु त्यानंतरही मेडिकल प्रशासन ढिम्म होते. ६ वाजताच्यासुमारास जेव्हा मृतदेहाजवळ गर्दी व्हायला लागली तेव्हा मेडिकलच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना फोनवरून याची माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.