सोशल डिस्टेंसिंगबाबत WHO ने दिला मोलाचा सल्ला; 'असे' आहेत इतर देशांचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 05:20 PM2020-06-28T17:20:30+5:302020-06-28T17:27:03+5:30

CoronaVirus latest News Update : एखादी व्यक्ती शिंकत किंवा खोकत असल्यास त्या व्यक्तीपासून लांब राहायला हवे.

Social distancing is important in the fight with corona know what the who says | सोशल डिस्टेंसिंगबाबत WHO ने दिला मोलाचा सल्ला; 'असे' आहेत इतर देशांचे नियम

सोशल डिस्टेंसिंगबाबत WHO ने दिला मोलाचा सल्ला; 'असे' आहेत इतर देशांचे नियम

Next

(image credit- The wired)

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर आणि सोशल  डिस्टेंसिंगचे पालन केलं जात आहे. जगभरातील विविध शास्त्रज्ञ कोरोना विषाणूंवर लस आणि औषध शोधत आहेत. तर भारतातील कोरोनाची रुग्णांची संख्या पाच लाखापर्यंत पोहोचली आहे. सोशल  डिस्टेंसिंग म्हणजेच एकमेकांपासून किती अंतर लांब असायला हवं. याबाबात लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे.  याबाबत इतर देशांतील नियम आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिला सल्ला लक्षात आल्यास संभ्रम दूर होऊ शकतो. 

कोणी लावला सोशल डिस्टेंसिंगचा शोध?

 कोरोना काळात सोशल डिस्टेंसिंग या शब्दाचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. १९३० मध्ये  विलियम एफ वेल्स यांनी या संज्ञेचा शोध लावला.  तोंडातून निघणारे लाळेचे ड्रॉपलेट्स एक ते दोन मीटरपर्यंत जाऊ शकतात. ४ जुलैपासून ब्रिटनमध्ये सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. २ मीटरचे सोशल डिस्टेंसिंग आत्तापर्यंत पाळले जात होते. आता २ मीटरवरून १ मीटर करण्यात आले आहे. 

चीन, डेनमार्क, हाँगकाँग, सिंगापूर, फ्रान्स या देशात १ मीटरचं अंतर ठेवून सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. तर ऑस्ट्रेलिया, ग्रीस, जर्मनी, स्पेन, बेल्जियम, इटली, पोर्तुगाल या देशात १.५ मीटरचं अंतर ठेवणं अनिर्वाय आहे. अमेरिकेत  १.८ मीटरचं अंतर  ठेवण्याचे सांगितले जात  आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी १ मीटर अंतर ठेवणं गरजेचे आहे.  एखादी व्यक्ती शिंकत किंवा खोकत असल्यास त्या व्यक्तीपासून लांब राहायला हवे. कारण त्या व्यक्तीच्या जवळपास असल्यास लाळेतून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समार्फत  संक्रमण पसरण्याचा धोका असतो. द लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार १ मीटरचं अंतर ठेवल्यास संक्रमणाचा धोका टळू शकतो.  पण २ मीटरचं अंतर ठेवल्यास सुरक्षित ठरू शकतं.

समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

रोज जीरं आणि गुळाचे सेवन कराल तर 'या' गंभीर समस्यांपासून नेहमी लांब राहाल

Web Title: Social distancing is important in the fight with corona know what the who says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.