...म्हणून नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम करावा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 15:17 IST2017-07-28T09:47:01+5:302017-07-28T15:17:01+5:30
नवीन संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अजून जास्त फायदे होऊ शकतात असे आढळले आहे. चला जाणून घेऊया नाश्त्याच्या आधी व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत.
.jpg)
...म्हणून नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम करावा !
व यायाम करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. व्यायामाने आपले शरीर सुदृढ राहून आपण निरोगी राहतो. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांच्या संक्रमणापासून आपला बचाव होतो. अशा अनेक फायद्यांमुळेच प्रत्येक सेलिब्रिटी रोज नियमित व्यायाम करणे विसरत नाहीत.
व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत, मात्र एका नवीन संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अजून जास्त फायदे होऊ शकतात असे आढळले आहे.
नाश्ता करण्यापुर्वी व्यायाम किंवा काम केल्यास शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही, म्हणजे वजन वाढीवर नियंत्रण येते, असे अभ्यासात म्हटले आहे.
म्हणून आपणास व्यायामाच्या आधी स्रॅक्स किंवा शेक घेण्याची सवय असेल तर ही सवय आपणास हळुहळू बदलायला हवी. चला जाणून घेऊया नाश्त्याच्या आधी व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत.
या अभ्यासात संशोधकांनी काही पुरुषांचा एक गट तयार केला आणि त्यांना उच्च कॅलरी आहार घेण्यास दिला. दररोज सकाळी नाश्ता करण्यापूर्वी त्यांच्यातील अर्धेजण रोज व्यायाम करत होते. आश्चयार्ची गोष्ट म्हणजे, त्यांचे वजन न वाढता नियंत्रणातच होते. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
शिवाय याचा अजून एक फायदा असा आहे की, आपण नेहमी अॅक्टिव राहून दिवसभर फ्रेशदेखील वाटेल. मात्र जर आपण व्यायाम करण्याआधीच कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता करीत असाल तर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. वजन वाढल्याने अनेक समस्याही निर्माण होतात. यासाठी नाश्ता करण्यापुर्वीच व्यायाम करावा. यात आपण कार्डिओ आणि हिट प्रकारचे मध्यम ते प्रखर स्वरुपाचे व्यायाम प्रकार करु शकता. शिवाय जड वजन उचलण्याचे व्यायाम प्रकार करताना मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Also Read: FITNESS : जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?
: Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !