१५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये 'या' कारणाने वाढतोय Testicular cancer 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 10:45 AM2019-12-03T10:45:47+5:302019-12-03T10:49:48+5:30

पुरूषांमध्ये होणाऱ्या कॅन्सरबाबत सांगायचं तर केवळ १ ते २ टक्केच लोकांना टेस्टिकुलर कॅन्सर होतो. पण पुरूषांच्या कॅन्सर होण्याच्या या संख्येत १५ ते ३५ वयोगटातील तरूणांचं प्रमाण अधिक असतं.

Smoking cannabis increases testicular cancer risk | १५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये 'या' कारणाने वाढतोय Testicular cancer 

१५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये 'या' कारणाने वाढतोय Testicular cancer 

googlenewsNext

(Image Credit : medicalnewstoday.com)

पुरूषांमध्ये होणाऱ्या कॅन्सरबाबत सांगायचं तर केवळ १ ते २ टक्केच लोकांना टेस्टिकुलर कॅन्सर होतो. पण पुरूषांच्या कॅन्सर होण्याच्या या संख्येत १५ ते ३५ वयोगटातील तरूणांचं प्रमाण अधिक असतं. लक्ष देण्यासारखी बाब ही आहे की, या वयोगटातील तरूणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये या वयोगटातील तरूणांमध्ये वाढता टेस्टिकुलर कॅन्सर आणि गांजाचा वापर यात संबंध शोधला गेला.

(Image Credit : independent.co.uk)

news-medical.net च्या वृत्तात तज्ज्ञांनुसार, १९५० पासून आतापर्यंत यूनायटेड स्टेट, कॅनडा, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅंडमध्ये टेस्टिकुलर कॅन्सरच्या केसेस वेगाने वाढत आहेत. अशाप्रकारे कॅन्सर वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. यात बायोलॉजिकल आणि जेनेटिक कारणांचाही समावेश आहे. पण आजच्या काळात टेस्टिरकुलर कॅन्सर होण्याचं एक मोठं कारण म्हणून गांजाचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर पुढे येत आहे.

फ्रेड हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरचे डॉ. स्टीफन श्र्वार्ट्ज यांच्या नेतृत्वातील टीमने केलेल्या रिसर्चमधून समोर आले आहे की, जे तरूण नियमितपणे किंवा आठवड्यातून एकदा गांजाचा वापर करतात, त्यांच्यात टेस्टिकल्ससंबंधी कॅन्सरचा होण्याचा धोका अधिक वाढतो. हेच कारण आहे की, याप्रकारच्या कॅन्सरचे जास्तीत जास्त रूग्ण हे तरूण वयातील आहेत.

(Image Credit : utoronto.ca)

रिसर्चमधून असेही समोर आले आहे की, टेस्टिकल्स हे त्या निवडक अवयवांपैकी एक आहे जे टेट्राहायड्रोकॅनाबिनोलच्या विशेष रिसेप्टर्सना साठवून ठेवतात, हे रिसेप्टर्स अफूतील सक्रिय घटक आहे. सोबतच पुरूषांच्या जननांगेत कॅन्सर विरोधी गुण निर्माण करतात. या रिसर्चनंतर गांजा आणि टेस्टिकुलर कॅन्सर यांच्यातील संबंध शोधण्यासाठी खास मदत मिळण्याची आशा आहे.


Web Title: Smoking cannabis increases testicular cancer risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.